-
तुळशीच्या पानांचे रोज सेवन करणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते, तसेच तुम्हाला यातून अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.
-
आज आम्ही तुम्हाला त्याचे काही चमत्कारिक आणि फायदेशीर फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
-
श्वासाच्या दुर्गंधीपासून आराम – तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुळशीची पाने थेट चघळू शकता किंवा मोहरीच्या तेलात कोरडी पाने मिसळून पेस्ट करू शकता, दोन्ही प्रकारे तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल.
-
तणाव, चिंता दूर होते – तुळशीमध्ये तणावविरोधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणावही दूर होतो.
-
तणाव दूर ठेवण्यासाठी व्यक्तीने दररोज दोनदा तुळशीच्या १२ पानांचे सेवन करावे.
-
हृदयाचे आजार – तुळशीमध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते आणि तसंच ही पाने हृदयविकार संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत करते.
-
घशातील खवखव दूर करते – तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने घसादुखीमध्ये त्वरित आराम मिळतो.
-
श्वसनाच्या समस्यांमध्ये फायदा – मध, आले आणि तुळस एकत्र करून बनवलेला रस प्यायल्याने ब्राँकायटिस, दमा, कफ आणि सर्दीमध्ये बराच आराम मिळतो.
-
संसर्ग – रोज तुळशीची काही पाने चघळल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”