-
मासिक पाळी सुरू होण्याआधी स्तनांमध्ये जे बदल होतात, तसेच हे बदल असतात. स्तनांचा आकार वाढलेला किंवा सूज आल्यासारखे वाटते. हे बहुतेकदा गर्भधारणेचे पहिले शारीरिक लक्षण असते.
-
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात स्तन आणि/किंवा स्तनाग्र अनेकदा दुखत असतात, सुजतात किंवा कोमल होतात. याचे कारण म्हणजे स्तनपानाच्या तयारीसाठी स्तनांमध्ये बदल होत असतात. हे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या उत्पादनामुळे होते.
-
मळमळ, ज्याला मॉर्निंग सिकनेस म्हणूनही ओळखले जाते, तो तुम्हाला दिवसभरात कधीही किंवा दिवसभर त्रास देऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरातील हार्मोन्सच्या वाढीव पातळीमुळे असे होते. या संप्रेरकांचा पचनसंस्थेवर परिणाम होऊन मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्ताचा त्रास होतो. इस्ट्रोजेनमुळे गंधांची विशेष संवेदनशीलता होऊ शकते.
-
गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा स्त्रीचे शरीर शारीरिक आणि हार्मोनल बदल घडवून आणण्यासाठी खूप मेहनत घेत असते. याचा अर्थ संप्रेरकांचे उत्पादन वाढले आहे, तसेच रक्त प्रवाह वाढल्यामुळे हृदय कठोर आणि जलद पंप करत असते. वाढत्या गर्भाला पोषक तत्वे आणण्यासाठी आवश्यक असते. बहुतेक गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात जास्त थकवा येण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रोजेस्टेरॉनचे वाढलेले उत्पादन.
-
मासिक पाळी नियमित येत असल्यास ती चुकली असेल, तर सर्वात आधी प्रेगनंसी टेस्ट करायला हवी. पाळी चुकणे हे गर्भधारणेच्या निश्चित लक्षणापैकी एक आहे. पण ज्यांची पाळी अनियमित आहे, त्यांना मात्र काही हे लक्षण दिसू शकत नाही.
-
गर्भाशय वाढतंय म्हणून पोट फुगत नाही, तर हे हार्मोनल बदलांमुळे होते. गर्भावस्थेच्या सुरवातीच्या काळात शरीरात प्रोजेस्टेरॉनची जास्त प्रमाणात उत्पादित होत असते, त्यामुळे काही पोटाचे काही स्नायू शिथील होतात,याचा परिणाम म्हणून पोट फुगल्यासारखे वाटू शकते.
-
गर्भावस्थेदरम्यान रक्तात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्याने हार्मोनचा स्तर वाढतो. यामुळे गर्भधारणेनंतर महिलांमध्ये अनेक भावनिक बदल पाहायला मिळतात. चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या भावना या काळात अऩुभवल्या जाऊ शकतात.
-
एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा किंवा एखाद्या पदार्थ खावासा न वाटणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते. पण केवळ या एका लक्षणावर विसंबून राहून चालणार नाही, कारण शरीरात एखाद्या पोषक घटकाची कमतरता असल्यासही असे होऊ शकते. त्यामुळे या लक्षणासह यादीतील इतर लक्षणेही तपासून पाहायला हवीत. काही महिलांमध्ये गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत म्हणजे अगदी मासिक पाळी चुकण्यापुर्वीच खाण्याबाबतचे काही बदल दिसू शकतात.
-
घरच्या घरी लघवीची तपासणी करून गर्भधारणा झाली की नाही हे पाहणे सोपे झाले आहे. पण गर्भधारणेनंतर लवकरच ही तपासणी केल्यास ती नकारात्मक येऊ शकते. त्यामुळे काही दिवस वाट पाहून मासिक पाळी न आल्यास पुन्हा एकदा तपासणी करायला हवी. रक्ताची तपासणीद्वारेही गर्भधारणा झाली की नाही, हे पाहीले जाऊ शकते.(All Photos : Freepik)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा