-
तुम्हालाही टक्कल पडत आहे का? किंवा तुमचे केस वेगाने गळत आहेत का? (Photo : Freepik)
-
केस गळणे थांबवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाची मदत घेऊ शकता. (Photo : Freepik)
-
कांद्याच्या रसाशी संबंधित कोणत्या पद्धती तुम्ही तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये अवलंबू शकता ते जाणून घ्या. (Photo : Freepik)
-
कांद्याच्या रसाचा मसाज: अनुवांशिक कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या असू शकते. (Photo : Freepik)
-
परंतु केस गळण्यामागे पोषणाचा अभाव हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. केसांचे पोषण करायचे असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावी. (Photo : Freepik)
-
नारळ आणि कांद्याचा रस: केसगळती रोखायची असेल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेल आणि कांद्याच्या रसाचे मिश्रण तयार करून केसांना लावा. (Photo : Pexels)
-
यासाठी एका भांड्यात कांद्याचा रस घ्या आणि त्यात तीन ते चार चमचे खोबरेल तेल मिसळा. (Photo : Pexels)
-
हा एक प्रकारचा हेअर मास्क आहे, जो तुम्ही केसांवर नियमितपणे लावला पाहिजे. (Photo : Pexels)
-
कांदा आणि कोरफड: कांदा आणि कोरफड हे दोन्ही अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्रोत आहेत जे केस गळणे कमी करू शकतात. (Photo : Freepik)
-
याशिवाय या दोन्हीमुळे टक्कल पडण्याची समस्याही दूर होऊ शकते. (Photo : Freepik)
-
कोरफड आणि कांदा एकत्र करून केसांना लावा आणि ते कोरडे होऊ द्या. (Photo : Freepik)
-
अंड हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून ते कांद्याच्या रसात मिसळून केसांना लावल्यास केसगळती कमी होऊ शकते. (Photo : Pexels)
-
यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात कांद्याचा रस घालून फेटून घ्या. (Photo : Pexels)
-
आता हा मास्क केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर शॅम्पूने धुवा. (Photo : Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Freepik/Pexels)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड