-
भारतात दिवसाची सुरुवात सकाळी चहाने बहुसंख्य करतात. दिवसाची सुरुवात चहाने न करण्याची कल्पनाच बहुतेकांना करवत नाही.
-
चहा हे पेय भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे.
-
परंतु दिवसा रिकाम्या पोटाने चहा पिणे हितकारक की अहितकारक, याविषयी आहारतज्ज्ञांची काही मते आहेत.
-
या आहारतज्ज्ञांच्या मते चहाने तरतरी येते. त्यातील ऑक्सिडीकरण विरोधी घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होते.
-
चयापचय क्रियेसही चहा पूरक आहे. परंतु, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आपले पोट बिघडू शकते.
-
रोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात आम्लवृद्धी होते. त्याचा पचनावर दुष्परिणाम होतो.
-
तज्ज्ञांच्या मते सकाळी मोकळ्या पोटी चहा प्यायल्याने खालील दुष्परिणाम होऊ शकतात.
-
डोकेदुखी : आपली डोकेदुखी घालवण्यासाठी कधी काही जण रिकाम्या पोटी चहा घेतात. वास्तविक त्यामुळेच त्यांची डोकेदुखी वाढू शकते.
-
चहातील ‘कॅफिन’ या घटकामुळे तसे होते. झोपेआधी योग्य काळ आधी योग्य प्रमाणात पाणी पिणे त्यासाठी हितकारक ठरते.
-
भारतात दिवसाची सुरुवात सकाळी चहाने बहुसंख्य करतात. दिवसाची सुरुवात चहाने न करण्याची कल्पनाच बहुतेकांना करवत नाही.
-
अपचन आणि निर्जलीकरण : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पचनसंस्थेत वातवृद्धी (गॅसची वाढ) होते.
-
त्यानंतर पुरेसे पाणी न प्यायल्यास निर्जलीकरणाची जोखीम वाढते. रात्रभर काही तास झोपल्याने आपल्या शरीरात आधीच निर्जलीकरण झालेले असते. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा प्यायल्याने हे निर्जलीकरण वाढते.
-
चहामध्ये ‘थिओफिलिन’ हा रासायनिक घटक असतो. त्याचा आपल्या विष्ठेवर परिणाम होऊन बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.
-
पोषक तत्त्वांचे शोषण रोखते : चहामध्ये असलेला ‘टॅनिन’ घटक अन्नातून लोह शोषण्यास अडथळा आणतो.
-
आम्लपित्त वृद्धी : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पोटातील आम्ल आणि अल्क धर्मीय द्रवांचा समतोल बिघडतो.
-
हा समतोल बिघडल्याने आम्लपित्त वृद्धी (अॅसिडिटी) होते.
-
छातीच्या खालच्या भागात वेदना जाणवू शकतात, जळजळ होते. पोटात चहा गेल्याने हा त्रास होऊ शकतो.
-
त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात, की आपल्या नाश्त्याबरोबर चहा घ्यावा. चहात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
-
असं केल्याने जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी क्षार मिळण्यास मदत होते.
-
पचनक्षमतेतही त्यामुळे वृद्धी होते.
-
सकाळी उठल्यावर पेलाभर कोमट पाणी नियमित प्यायल्यास निरोगी राहण्यास मदत होते.
-
खरे तर तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची आदर्श वेळ दुपारी तीन वाजताची आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि फ्लू-सर्दी टळू शकते.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”