-
प्रत्येक पालकाची तक्रार असते की त्यांची मुलं नीट जेवत नाहीत, अभ्यास करत नाहीत किंवा खूप मस्ती करतात.
-
आजच्या व्यस्त वेळापत्रकात मुलांना हाताळणे सोपे नाही आणि अशा परिस्थितीत पालक अशा चुका करतात, ज्यामुळे मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो.
-
आज आपण पालक करत असलेल्या अशा काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्वरित टाळायला हव्या आहेत.
-
यामधील सर्वांत मोठी चूक म्हणजे, आजकाल पालक आपल्या मुलांना मैदानात खेळायला पाठवण्याऐवजी स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर गेम खेळू देतात.
-
अशा परिस्थितीत स्क्रीन जास्त वेळ वापरल्याने मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यासोबतच मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही बिघडते.
-
मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणेही त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. आजच्या काळात आपली शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी पालक आपल्या मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात.
-
अशा परिस्थितीत, मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र माहित नसते आणि ते योग्य आणि चुकीचे फरक करू शकत नाहीत.
-
मुलाच्या चुकीवर पालक त्यांना ओरडतात असे अनेकदा दिसून येते. असे केल्याने मुलाच्या मनात भीती बसते आणि ते पालकांपासून गोष्टी लपवू लागतात.
-
प्रत्येक गोष्टीवर मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पालकांच्या रागामुळे मुलेही तापट स्वभावाची होतात.
-
मुलांबाबत पालकांची आणखी एक मोठी चूक म्हणजे ते त्यांची इतर मुलांशी तुलना करतात.
-
असे करणे टाळले पाहिजे, कारण सर्व मुले सारखी नसतात आणि प्रत्येकामध्ये काही चांगले किंवा वाईट असतात. सततची तुलना केल्याने मुलांचे मन दुखावते.
-
मुलांना समजावून सांगण्यासाठी त्यांना ओडरण्याऐवजी त्यांच्यासाठी काही नियम बनवा.
-
उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाला जंक फूडची आवड असेल आणि तुम्हाला ही सवय बदलायची असेल, तर तुम्ही स्वतः जंक फूडचे सेवन करू नका आणि त्यासाठी जंक फूड आठवड्यातून किंवा १० दिवसांतून एकदाच खायचे असा एक नियम बनवून घ्या.
-
अनेकदा पालक ही चूक करतात की ते त्यांच्या मुलांबाबतचे सर्व निर्णय स्वतः घेतात.
-
असे करण्यापेक्षा मुलांना काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. यामुळे मुलांमध्ये विचार आणि समज विकसित होईल आणि त्यांची सर्जनशीलताही सुधारेल. (सर्व फोटो : Pexels)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख