-
Ganesh Chaturthi 2022 Prasad Ideas : गणपतीसाठी घरी आल्यावर त्यांच्यासाठी रोज आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला जातो. तसंतर आपण गणेसोत्सव काळात घरात जे पदार्थ तयार करतो ते बाप्पाला अर्पण करतो. (Photo: Freepik)
-
पण, गणेशाला रोज आरती झाल्यावर गणरायासाठी नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत असते. (Photo: Freepik)
-
१० दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता. (Photo: Freepik)
-
पायसम : पायसम नारळाचे दूध आणि गुळापासून बनवले जाते. पायसम हे केरळमधील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. भातापासून तयार केलेला हा गोड पदार्थ गणपतीला भोग म्हणून अर्पण केला जाऊ शकतो. (Source: Nestle)
-
तिळाचे लाडू: तीळ, गूळ, शेंगदाणे आणि सुखं खोबरं यांपासून तयार केलेले हे लाडू भगवान गणेशाला नैवेद्य म्हणून आवडतील. (Photo: Freepik)
-
खीर: तांदळाची खीर देखील नैवैद्यासाठी योग्य आहे. सुका मेवा, तांदूळ, वेलची आणि साखरेपासून तयार केलेला हा नैवैद्य गणेशाला नक्कीच आवडेल. (Source: Wikipedia)
-
पुरण पोळी: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक पुरण पोळी देखील गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाऊ शकते. खायला खूप चविष्ट असते. (Source: File Photo)
-
बेसन लाडू : तुम्ही गणपतीला तुपात बनवलेले बेसन लाडूही अर्पण करू शकता. (Photo: Freepik)
-
मोतीचूर लाडू : यावेळी मोदकाशिवाय मोतीचूर लाडू बनवून गणपतीला अर्पण करू शकता. आपण ते घरी तयार करू शकता. (Photo: Freepik)
-
मोदक: तुम्ही गणपतीला रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून देऊ शकता. मोदक हा त्यांचा आवडता नैवेद्य आहे. (Photo: Freepik)
-
बासुंदी: गोड कंडेन्स्ड दुधापासून बासुंदी तयार केली जाते. त्यातील ड्रायफ्रुट्स, वेलची आणि जायफळ त्याची चव आणखी वाढवतात.
-
कलाकंद : दुधाचे मिश्रण करून तयार केलेला कलाकंद गणपतीसोबतच सर्व भक्तांना आवडेल. तुम्ही ते नैवेद्य म्हणून तयार करून देऊ शकता.
-
श्रीखंड: हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे, जो तुम्ही घरी तयार करू शकता आणि गणपतीला प्रसाद म्हणून देऊ शकता. (Photo: Freepik)

बॉलीवूड अभिनेत्री ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई, १२ वर्षांनी लहान आहे पती, जोडप्याने शेअर केला खास Video