-
अनेक स्त्रिया पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असतात. वेगवेगळ्या कारणांमुळे पिंपल्स येऊ शकतात. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे त्वचेची नीट काळजी न घेणे.
-
पिंपल्समुळे आपल्याला कोणत्याही समारंभाला जाण्यासाठी संकोच वाटतो. यावर उपाय करण्यासाठी अनेक प्रोडक्टस, ट्रीटमेंट ट्राय केले जातात, पण त्यामुळे देखील काही फरक जाणवत नाही. उलट यामुळे त्वचेची हानी होण्याची शक्यता असते.
-
आपल्या सकाळच्या काही सवयी देखील पिंपल्ससाठी कारणीभूत ठरतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घेऊया.
-
काही जणांना सकाळी उठल्यानंतर चेहरा चोळण्याची सवय असते. यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते.
-
रात्रभर चेहऱ्यावर घाम आणि नैसर्गिक तेल जमा झालेले असते. त्यामुळे उठल्यानंतर पाण्याने चेहरा धुवून नंतर फेसवॉशचा वापर करावा.
-
कमी पाणी प्यायल्याने पिंपल्स येऊ शकतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पोट साफ होते आणि पिंपल्सची समस्या कमी होते.
-
सनस्क्रीन न लावता घराबाहेर पडल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.
-
त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लिनिंग, टोनिंग, मॉइश्चरायजिंग ह्या स्टेप्स सकाळी फॉलो करणे महत्वाचे असते. या स्टेप्स फॉलो न केल्याने चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते.
-
सकाळच्या नाश्त्यात तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तेलकट आणि जंक फूड खाणे टाळावे. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल