-
निरोगी राहण्यासाठी नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
-
त्यातही कारले शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सर्वजण दैनंदिन आहारात कारल्याचा समावेश करतात. कारले खाणे शरीरासाठी फायदेशीर असते, पण काही वेळा अति प्रमाणात कारले खाल्ल्याने शरीराला नुकसानकारक देखील ठरू शकते
-
त्यामुळे कारल्याचे शरीराला होणारे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.
-
कारले खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात जाणून घेऊया.
-
कारल्याच्या पानांच्या रसात हळद मिसळून केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. तसेच डँड्रफपासून मुक्ती मिळवण्यासाठी कारले खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
घसा बसला असेल किंवा आवाज खराब झाला असेल तर कारले खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
कफच्या समस्येवर कारले खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
कारले खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते जाणून घेऊया.
-
लो ब्लड शुगर असणाऱ्यांनी कारले खाणे टाळावे. मधूमेहासाठी कारले खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण कारले खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते पण लो ब्लड शुगर असणाऱ्यांनी जास्त कारले खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता असते.
-
गरोदर स्त्रियांनी कारले खाणे टाळावे गरोदरपणात कारले खाल्ल्यास बाळासाठी नुकसानकारक ठरू शकते.
-
कारल्याचे रोज सेवन केल्यास ते लिवर म्हणजेच यकृतासाठी हानिकारक ठरू शकते. कारल्यामध्ये लेक्टिन आढळते. कारले खाल्ल्याने यकृतातील प्रथिनांची देवाणघेवाण थांबू शकते. त्यामुळे नियमित कारले खाणे टाळावे.
-
कारल्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने जुलाब आणि उल्टीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जे पालक रोज मुलांना कारले खाण्यास आग्रह करतात, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”