-
आयोडीनची कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. एका सुदृढ व्यक्तीला रोज जवळपास 150 मायक्रोग्रॅम आयोडीनची गरज असते.
-
आयोडीनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवणे, केसगळती, मानेवर सूज असे त्रास जाणवू शकतात. तुम्हालाही असे त्रास होत असतील तर वेळीच हे संकेत ओळखा.
-
आयोडीनच्या कमतरतेचे लक्षण असल्यास आपण रक्ताची तपासणी करून वेळीच उपचार सुरु करू शकता. यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहुयात…
-
दही: दह्याच्या सेवनाने आयोडीनचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरात अति आयोडीनमुळे त्रास जाणवत असेल तर दह्याच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. दह्यातील चांगल्या बॅक्टरीयामुळे पचनक्रियाही सुरळीत होते.
-
अंडी : अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते. आयोडीनची कमतरता असल्यास अंड्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंड्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
-
भाजलेले बटाटे: बटाट्याचे पदार्थ अनेकांना आवडतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, पोटॅशियम व आयोडीनसारखी पोषक तत्वे असतात. तुम्ही आहारात कमी तेलात भाजलेले बटाटे समाविष्ट करून आयोडीनची कमतरता भरून काढू शकता.
-
दूध: दूध हे कॅल्शियमचा खजिना आहेच पण त्यात आयोडीनचेही प्रमाण मुबलक असते. आयोडीनचे प्रमाण स्थिर करण्यासाठी नियमित दुधाचे सेवन करावे.
-
मीठ: मीठामध्ये आयोडीनचे प्रमाण तपासून घ्या. आहारात योग्य प्रमाणात मीठ असल्यास अनेक विकार दूर राहण्यास मदत होते.
-
अननस व बेरी: स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी व अननस यांसारख्या फळांमध्येही आयोडीनचे प्रमाण मुबलक असते.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स