-
अनेक लहान मुलांना अपचन व बद्धकोष्ठतेचा त्रास सतावत असतो. शाळेत जाण्याच्या घाईत नाष्टा न केल्याने, जेवणाच्या वेळा न पाळल्याने अशा समस्या उद्भवतात.
-
नाष्टा जर टेस्टी असेल तर नक्कीच तुमची मुलं खाण्यास टाळाटाळ करणार नाहीत, पण हेल्थ व टेस्टचं समीकरण जुळवायचं कसं? हे आज आपण आज पाहणार आहोत.
-
आठवड्याभरात तुम्ही नियोजन करून हे फायबर युक्त आणि सुपरटेस्टी पदार्थ तुमच्या चिमुकल्यांना खाऊ घाला. यात तुमचा वेळ जाणार नाही याचीही काळजी घेतली आहे. चला सुरू करू..
-
उपमा- ओट्स खाण्यास टाळाटाळ होत असेल तर रव्याचा उपमा त्याला पर्याय पुरवतो. तुमच्या मुलांच्या सवयी व आवडीनुसार उपमा सुका किंवा मऊ करू शकता. यात टेस्टी भाज्या घालून चवही कमाल लागते वरून शेव भुरभुरून दिल्यास तर अहा!
-
फ्रँकी किंवा रोल- पोळी भाजी खाण्यासाठी ना ना चा पाढा वाचणारी तुमची मुलं फ्रँकीला नाही म्हणणार नाहीत. एकदाच बाजारातुन टेस्टी सॉस आणून तुम्ही रोज वेगवेगळ्या भाज्या टाकून, चीज घालून तुम्ही मुलांना खुश करू शकता.
-
पीनट बटर ब्रेड – पीनट बटर मध्ये आयर्न, पोटॅशियम व मॅग्नेशियमची पोषक तत्वे असतात. यामुळे पचनासह स्नायूंच्या मजबुतीचेही काम होते. पीनट बटरला जोड म्हणून आपण जेली सँडविचही बनवू शकता.
-
पोहे- झटपट बनणारी कांदेपोहे फायबरचा खजिना आहेत. तुम्ही कधी बटाटा तर कधी डाळिंब घालून याची चव वाढवू शकता.
-
अंडी- ब्रेकफास्टमध्ये अंडी समाविष्ट केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहते असे डॉक्टर्स सांगतात. अंडी उकडून किंवा हाफ फ्राय करून त्यावर चीज स्लाइस घालून दिल्यास तुमची मुलं नाही म्हणणारच नाहीत.
-
ओट्स डोसा- मुलं खात नाहीत हे कारण सोडूनच द्या, जर तुम्ही एरवी बोरिंग वाटणाऱ्या ओट्सला वाटून त्याचे मस्त कुरकुरीत डोसे बनवले तर पोषण, चव हे दोन्ही साध्य करता येतील.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय