-
प्रत्येक अन्नपदार्थामधून आपल्याला वेगवेगळे पोषण मिळत असते. हे पोषण आपल्या शरीराच्या विविध भागांसाठी उपयुक्त असते. म्हणूनच निरोगी आणि पोषक आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
-
कांद्याचा वापर जवळपास सर्वच पदार्थांमध्ये केला जातो. कांद्याचेही आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात हे आता सिद्ध झाले आहे.
-
कांदा हे शिजवून किंवा कच्चाही खाल्ला जातो. मात्र भाजलेला कांदा खाण्याचेही अनेक फायदे आहेत.
-
आज आपण भाजलेला कांदा खाल्ल्याने कोणकोणते फायदे होऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया. (Photo : Flickr)
-
चांगली रोगप्रतिकारक शक्ती : भाजलेल्या कांद्याचे सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे, फोलेट, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व मिळतात.
-
यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपण निरोगी राहतो.
-
मजबूत हाडे : भाजलेल्या कांद्यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळते, यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
-
पचनासाठी फायदेशीर : भाजलेल्या कांद्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपली पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. (Photo : wikimedia)
-
बॉडी डिटॉक्स होण्यास मदत : भाजलेल्या कांद्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. भाजलेले कांदे तुम्ही भाज्यांमध्ये किंवा सॅलडमध्ये टाकून खाऊ शकता.
-
जळजळ कमी होते : भाजलेल्या कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. (Photo : wikimedia)
-
निरोगी किडनी : भाजलेल्या कांद्यामध्ये आढळणारे पोटॅशियम आणि मिनरल्स किडनीसाठी खूप चांगले मानले जातात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (उर्वरित सर्व फोटो : Pexels)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…