-
भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा आपल्याला रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असेल तर आधी रिझर्व्हेशन करायला लागते.
-
अशावेळी जर आपलं तिकीट हरवलं तर मात्र पंचाईत होऊ शकते. पण आता घाबरण्याचं कारण नाही.
-
रेल्वेने आता एक खास नियम बनवला असून त्यानुसार तुम्ही तुमचं तिकीट हरवल्यानंतरही निश्चिंत प्रवास करू शकता.
-
रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारतीय रेल्वेच्या नियमांमध्ये काउंटर तिकीट सोबत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून ट्रेन सुटल्यानंतर अर्ध्या तासानंतरही ती रद्द केली जाऊ शकते.
-
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही नेहमी काउंटरचे तिकीट सोबत ठेवावे, जेणेकरून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
-
अनेक वेळा असे होते की, आपण आपले तिकीट घरीच विसरतो किंवा आपले तिकीट हरवते.
-
अशा परिस्थितीत प्रवास कसा करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो.
-
पण जर तुम्ही ऑफलाइन तिकीट काढले असेल तर तुम्ही विंडो तिकिट घेऊन प्रवास करू शकता. यासाठी तुम्ही स्टेशन अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता.
-
तुमच्या आयआरसीटीसी अॅपमध्ये कोच आणि बर्थसह एक मेसेज असतो, याशिवाय तुमच्या फोन नंबर आणि मेलवरही यासंबंधी माहिती असते.
-
ही माहिती टीसीला दाखवून तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय प्रवास करू शकता.
-
आता रेल्वेकडून प्रवाशांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने तिकीट दिले जाते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तिकिटांचाही लाभ घेऊ शकता.
-
तुम्हाला मेलवरही तिकीट मिळते. हे तिकीट दाखवून तुम्ही प्रवास करू शकता. (सर्व फोटो : Indian express, Financial Express, Jansatta)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य