-
ऑक्टोबर महिन्यापासून शरद ऋतूला सुरुवात होते. या बदलत्या ऋतूमध्ये हंगामी फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-
ऑक्टोबर महिन्यापासून पावसाळा संपून वातावासनात बदल होण्यास सुरुवात होते. वातावरणात थंडावा आणि उष्णता दोघांचेही प्रमाण वाढू लागते.
-
या बदलत्या ऋतूत आहाराची काळजी घेणे आवश्यक ठरते, अन्यथा हंगामी आजारांचा धोका वाढू शकतो.
-
म्हणूनच ऑक्टोबर महिन्यात तुम्ही आपल्या आहारामध्ये खालील हंगामी फळांचा समावेश करावा.
-
पेरू – ऑक्टोबर महिन्यात बाजारात पेरू येऊ लागतात. या ऋतूत पेरू खाणे फायदेशीर आहे.
-
यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि फायबर मिळते. पेरू वजन कमी करण्यासही मदत करतो.
-
पपई – पपई सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होते. हिवाळा सुरू झाला की पपईचा हंगामही सुरू होतो.
-
पपई पोटाच्या आजारांपासून तुमचे रक्षण करते आणि व्हिटॅमिन सी, ए आणि फायबरने भरपूर असते.
-
डाळिंब – ऑक्टोबर हा डाळिंबाचा हंगाम आहे. या महिन्यात बाजारात भरपूर डाळिंब दिसतात. म्हणूनच या महिन्यात डाळिंब जरूर खावे.
-
डाळिंब खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते आणि शरीराला व्हिटॅमिन सी, के आणि बी मिळते.
-
सीताफळ – या काळात बाजारात भरपूर सीताफळ येतात. हे अतिशय चविष्ट फळ आहे.
-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी सीताफळ नक्की खावे. गरोदरपणातही सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.
-
सफरचंद – ऑक्टोबरपासून सफरचंदाचा हंगामही सुरू होतो. दररोज एक सफरचंद जरून खावे.
-
हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करते. सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…