-
बुध ग्रह स्वतःच्या कन्या राशीत प्रतिगामी आहे. १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान बुध वक्री अवस्थेत राहील. त्यानंतर ते पुन्हा मार्गी लागेल. यानंतर २६ ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या वक्री बुध कोणत्या राशींचे चमकवेल भाग्य.
-
वृषभ- बुध तुमच्या राशीच्या पाचव्या भावात भ्रमण करत आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संतती सुखाचे योग बनतील. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ राहील.
-
मिथुन- तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बुधाचे प्रतिगामी होणे लाभदायक ठरेल. या काळात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
-
वृश्चिक- तुमच्या राशीच्या अकराव्या घरात बुधाचे प्रतिगामी होणे लाभदायक मानले जाते. या काळात कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.
-
धनु- तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुधाचे स्थान शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. मात्र, बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
-
मकर- तुमच्या राशीच्या नवव्या घरातील बुधाचे स्थान लाभदायक ठरणार आहे. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.(सर्व फोटो: संग्रहित फोटो)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO