-
खराब जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
-
म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
-
काही मसाले आणि औषधी वनस्पतींच्या सेवनाने आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणू शकतो. जाणून घेऊया या औषधी वनस्पती आणि मसाल्यांबाबत.
-
जिनसेंग – मधुमेहाच्या रुग्णांसाठी जिनसेंग खूप फायदेशीर आहे. ते पुरेसे इन्सुलिन तयार करते.
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा रामबाण उपाय आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
मेथी – मेथीला कडू चव असते. मात्र ती वजन कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते.
-
याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मेथीचे सेवन तुम्ही चहा आणि पावडरच्या स्वरूपात करू शकता.
-
आले – आल्यामध्ये मधुमेहविरोधी, हायपोलिपिडेमिक आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात. हे चयापचय गतिमान करण्यास मदत करते.
-
हे रक्तातील साखरेची उच्च पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. आल्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.
-
दालचिनी – मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.
-
याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाचे रुग्ण दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels/Pixabay)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…