-
आता बाजारात पेरू सहजपणे मिळू लागले आहेत. भरपूर पोषक तत्व असलेले पेरू आल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
पेरूमध्ये आढळणारं मॅगनीज आहारातील आवश्यक पोषक तत्व शोषूण घेण्यास मदत करतं. तर यातील फोलेट प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतं.(फोटो: संग्रहित फोटो)
-
पेरूमध्ये दोन प्रकार आहे. गुलाबी आणि पांढरा पेरू, यातील कोणता पेरू जास्त फायदेशीर ठरतो? चला जाणून घेऊ याचं उत्तर(फोटो: indian express)
-
डायटिशिअन्स सांगतात की, पांढऱ्या पेरूच्या तुलनेत गुलाबी पेरूमध्ये शुगर आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं.(फोटो: pexels)
-
गुलाबी पेरूच्या तुलनेत पांढऱ्या पेरूमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचे गुण अधिक आढळून येतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
पण डायटिशिअन्स सांगतात की, शरीरासाठी गुलाबी पेरू जास्त चांगला असतो.(फोटो: जनसत्ता)
-
गुलाबी पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात. त्यासोबतच यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडही आढळून येतं.(फोटो: freepik)
-
यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो. यात आढळणारं फायबर डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं.(फोटो: freepik)
-
फायबर पचनक्रिया ठीक करतं. बद्धकोष्टतेपासून वाचवतं आणि पोट साफ करण्यास मदत करतं.(फोटो: freepik)

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा