-
पावसाळयात चप्पल काढल्यावर पायावर चट्टे उमटलेले दिसतात, या समस्येशी तर आपणही परिचित असाल.
-
केवळ उन्हामुळे नव्हे तर सतत पाण्यात राहिल्यानेही पाय काळवंडण्याची शक्यता असते.
-
अशावेळी तुम्ही काही घरगुती उपचारांनी पायावरचा मळ व डाग सहज दूर करू शकता. काय आहेत हे उपाय चला पाहुयात..
-
लिंबू व बटाटा- लिंबात व्हिटॅमिन सी व आम्ल असल्याने डाग हटवण्यात मदत होते तसेच त्वचेचा रंगही उजळतो. एका भांड्यात बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या व त्यात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण पायावर चोळून काही वेळ राहूद्या व नंतर धुवून टाका.
-
बेसन व दही- बेसनाचा फेसपॅक त्वचा उजळण्यात मदत करतो हाच पॅक पायाला लावून तुम्ही कठीण डागांपासून मुक्ती मिळवू शकता. बेसनात थोडे दही मिसळल्यास टॅन दूर होण्यास मदत होते.
-
ओट्स व दही- दह्यात अँटी टॅनिंग गुणधर्म असल्याने तुम्ही विविध पदार्थांमध्ये मिसळून त्याचा वापर करू शकता. ओट्स व दह्याचे मिश्रण पायावर लावल्यास एका स्क्रबचे काम करेल व टॅनिंग हटवण्यात मदत होईल.
-
कॉफी- कॉफी स्क्रब हल्ली बाजारात फारच ट्रेंडिंग आहेत. पण विकत आणण्यापेक्षा आपण घरीच कॉफी व दही एकत्रित करूनही स्क्रब बनवू शकता.
-
कॉफी व मध- दह्याला पर्याय म्हणून आपण मधही वापरू शकता. यामुळे त्वचेवरील डाग हटवण्यात व कडक झालेली मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
-
सुंदर पाय व मऊ तळव्यांसाठी आठवड्यातून एकदा गरम पाणी व जाड मीठ एकत्र घेऊन त्यात पाय घालून ठेवावेत जेणेकरून मृत त्वचेचे प्रमाण कमी होईल
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख