-
सध्या सर्वत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी २६ सप्टेंबर २०२२ पासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्री साजरी केली जाणार आहे.
-
या नऊ दिवसांमध्ये भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात.
-
यावेळी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी फळं किंवा फळांचा रस घेतला जातो.
-
सणांच्या दिवसात प्रत्येक घरात खाद्यपदार्थांची मेजवानी असते त्यामध्ये तेलकट पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. अशा पदार्थांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
-
अशावेळी आपल्याला सतत वजन वाढण्याची भीती वाटते. यावर उपाय म्हणजे सोप्पे डाएट फॉलो केले तर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. कोणते आहे हे डाएट जाणून घ्या.
-
नास्ता : जर तुमचा उपवास असेल तर दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळी पोटभर नाश्ता करा. नाश्त्यात तुम्ही रात्रभर भिजवून ठेवलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता.
-
याबरोबर फळं आणि दुधाचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. सकाळी पोटभर नाश्ता केल्याने तुम्हाला सतत भूक लागणार नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
-
दुपारचे जेवण : दुपारच्या जेवणात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. तळलेले उपवासाचे पदार्थ खाणे टाळा. दही आणि साबुदाण्याची खिचडी हा उपवासादरम्यान दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे.
-
डिटॉक्स ड्रिंक्स : उपवासादरम्यान शरीरात नेहमीची ऊर्जा जाणवत नसेल तर फ्रेश वाटण्यासाठी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक्स पिऊ शकता. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक, ग्रीन टी या ड्रिंक्समुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
-
संध्याकाळचा नास्ता : जर तुम्हाला उपवासा दरम्यान चिप्ससारखे तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर त्यामुळे वजन वाढू शकते.
-
त्याऐवजी भाजलेले मखना किंवा भाजलेले शेंगदाणे, अक्रोड यांचा आहारात समावेश करा. यामुळे पोटही भरेल आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल.
-
रात्रीचे जेवण : रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करा. तुम्ही शिजवलेले रताळे किंवा उपवासाला चालणाऱ्या भाज्या शिजवून खाऊ शकता. (फोटो सौजन्य : Freepik/Pexels/Unsplash)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…