-
प्रत्येक घरात दररोज जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. सणांच्या दिवसात तर वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट अन्नपदार्थ बनवले जातात. त्यामुळे महिनाभर चालणारा गॅस सिलेंडर लगेच संपण्याची शक्यता असते.
-
महागाईमुळे इतर वस्तूंप्रमाणेच गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे महिन्याचं बजेट सांभाळत गृहिणी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करत असतात. अशात जर गॅस वेळेआधी संपला तर खिशावर अधिक ताण पडू शकतो.
-
यावर उपाय म्हणजे काही कुकिंग टिप्स वापरून तुम्ही गॅसची बचत करू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.
-
प्रेशर कुकर : बरेचजण पारंपारिक पद्धतीप्रमाणे एखाद्या भांड्यात जेवणातील पदार्थ शिजवतात. त्यासाठी जास्त गॅसची गरज भासते. याच्या तुलनेत प्रेशर कुकरमुळे गॅसची बचत होऊ शकते. विशेषतः तांदूळ, डाळी शिजवताना प्रेशर कुकरचा वापर करा. यामुळे वेळेची देखील बचत होईल.
-
पाण्याचे प्रमाण : जेवण बनवताना त्या पदार्थांमध्ये कमी पाणी असेल तर गॅसची बचत होऊ शकते. जर तुम्ही भरपूर पाणी वापरत असाल तर ते आटवण्यासाठी जास्त वेळ गॅस सुरू ठेवावा लागेल, त्यामुळे गॅस लवकर संपेल.
-
जेवण बनवण्यापूर्वी डाळी काही वेळासाठी भिजत ठेवा : काही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डाळी थोडा वेळ भिजवून ठेवल्याने गॅसची बचत होईल. चणे, राजमा यांसारख्या गोष्टी रात्रभर भिजवून ठेवू शकता.
-
झाकण वापरा : कोणताही पदार्टज शिजवताना त्या भांड्यावर झाकण वापरा त्यामुळे अन्न लवकर शिजेल आणि गॅसची अधिक बचत होईल.
-
बर्नर साफ करा : शेगडीवरील बर्नर नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. खराब झालेल्या बर्नरमुळे गॅसचा जास्त वापर होऊ शकतो. शेगडीची नीट देखभाल केल्यास गॅसची बचत करण्यास मदत होईल.
-
कमी आचेवर अन्न शिजवा : अन्नपदार्थ कमी आचेवर शिजवा. एकदा त्या पदार्थातील पाणी उकळायला सुरुवात झाली की कमी आचेवर ते नीट शिजू शकते. अशा प्रकारे गॅसचा अपव्यय कमी होईल. (फोटो सौजन्य : Freepik/Pexels)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई