-
गरोदरपणात रोजचा त्रास, मळमळ, अशक्तपणा टाळायचा असल्यास नियमित आयुष्यात काही सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो. या सवयी कोणत्या हे जाणून घेऊयात..
-
गरोदर महिलांनी वाकून करायची कामे टाळावीत. जमिनीवर बसताना आजूबाजूच्या वस्तूंचा आधार घ्यावा.
-
गरोदर महिलांनी गरम पदार्थ खाणे टाळावे. सुरुवातीच्या तीन महिन्यात तरी मसालेदार व जळजळीत पदार्थांचे सेवन करू नये.
-
घरात पाळीव मांजर किंवा कुत्रा असल्यास त्याच्या केसाचा त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो अंगावर खेळवू नये.
-
गरोदर स्त्रियांनी वजनाने जड वस्तू थेट उचलू नये.
-
घरात अनेकजण स्वच्छतेसाठी फिनाईल व केमिकल युक्त लिक्विड वापरून लादी पुसतात याच्या उग्र दर्पामुळे मळमळ जाणवू शकते. याऐवजी नैसर्गिक फुलांचा वापर करावा
-
प्रेग्नन्सीच्या महिन्यांमध्ये कोणतीही क्रिया घाईने करू नये तसेच शरीराला झटके देणे टाळावे.
-
गरोदर महिलांनी अति उष्ण किंवा अति थंड वातावरणात राहू नये. घरात हवा आखेलती राहील याची सोय करावी.
-
गरोदर स्त्रियांनी उभे राहून काम करणे टाळावे. बसतानाही पोटाला आधार मिळेल अशा पद्धतीने बसावे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”