-
Diwali 2022 Calendar: लंकापती रावणाचा वध करून आणि १४ वर्षांचा वनवास घालवून भगवान श्रीराम अयोध्येत परतले. त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यावासीयांनी तुपाचे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली.
-
दसऱ्यानंतर पूर्ण २१ दिवसांनी दिवाळी सणाला आरंभ होतो.
-
दरवर्षी कार्तिक महिन्यात दिवाळी हा सण साजरा केला जातो. हा पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो.
-
यंदाच्या दिवाळी सणातील प्रमुख सणांच्या तारखा, शुभ मुहूर्त व तिथी जाणून घेऊयात..
-
धनत्रयोदशी: धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यासोबतच आपल्याकडे धनाचे पूजनही या दिवशी केले जाते. यंदा २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे.
-
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त: रविवार, २२ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५:४४ ते ६:०५ पर्यंत
-
नरक चतुर्दशी: सुगंधी उटण्याने करायचे दिवाळीचे अभ्यंगस्नान यंदा २४ ऑक्टोबरला असणार आहे.
-
नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुरचा वध करून १६ हजार कन्यांना मुक्त केले होते अशी आख्यायिका आहे.
-
लक्ष्मी पूजनही सोमवारी २४ ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीसह श्रीगणेशाचे पूजन केले जाते.
-
लक्ष्मी पूजन मुहूर्त – २४ ऑक्टोबर संध्याकाळी ०६: ५३ ते ०८: १६ पर्यंत
-
यंदा नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन तिथीनुसार एकाच दिवशी साजरे होणार आहे.
-
२५ ऑक्टोबरला अमावस्या असल्याने या दिवशी दिवाळीतील कोणताच शुभ दिवस नसणार आहे.
-
२६ ऑक्टोबरला भाऊबीज व बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हे दोन सण एकत्र साजरे केले जाणार आहे.
-
भाऊबीज शुभ मुहूर्त – २६ ऑक्टोबर दुपारी १ वाजून १८ मिनिट ते दुपारी ३ वाजून ३३ मिनिट पर्यंत
-
तुम्हाला सर्वांना येत्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल