-
मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण असे अनेक पदार्थ असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अपायकारक ठरू शकतात.
-
म्हणूनच आरोग्य तज्ञ मधुमेहाच्या रुग्णांना निरोगी अन्न खाण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढून तुम्हाला किडनीचे आजार आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या इतर आजारांचा धोका वाढू शकतो.
-
मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे अनेकदा घातक ठरू शकते. कारण हा आजार तर अनेक गंभीर आजारांचे कारणही बनू शकतो.
-
मात्र असेही काही पदार्थ आहेत, जे मधुमेहाच्या आजारावर एखाद्या संजीवनीप्रमाणे काम करू शकतात. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.
-
योगर्ट हा प्रोबायोटिक्सने समृद्ध असा पदार्थ आहे. यामुळे साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
-
म्हणूनच ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असून त्यांनी रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.
-
अनेक प्रकारच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात आवश्यक पोषक तत्त्वे असतात. या बिया रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणाऱ्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
-
रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया आणि फ्लेक्ससीड्स खाऊ शकता.
-
अंड्याला सुपरफूडचा दर्जा दिला जातो आणि अनेकदा लोकांना ते नाश्त्यात खाणे आवडते.
-
यामध्ये प्रथिनांसह अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. अंडी इन्सुलिनची संवेदनशीलता कमी करण्यास मदत करतात.
-
भेंडी ही अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. त्यात भरपूर पॉलिसेकेराइड कंपाऊंड असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास प्रभावी आहे.
-
तसेच, ही भाजी फ्लेव्होनॉइड्सचा समृद्ध स्रोत आहे. फ्लेव्होनॉइड्स हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट आहे जे हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य सुधारतो.
-
संपूर्ण धान्य म्हणजेच ‘होल ग्रेन’मध्ये भरपूर विद्रव्य फायबर असते.
-
यामध्ये गहू, क्विनोआ आणि ओट्स सारख्या धान्यांचा समावेश आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे संपूर्ण धान्य प्रक्रिया केलेल्या धान्यापेक्षा अधिक चांगले आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : Pexels)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन