-
बाळाला आईचे दुध दिल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.
-
नॉर्मल डिलेवरीनंतर बदाम आणि मनुके खावेत. दहा मनुके आणि दहा बदाम मिक्स करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर गरम दूधामध्ये मिक्स करून घ्या. हे दूध रात्री झोपण्याआधी प्या.
-
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात डेयरी प्रोडक्ट्स अर्थात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
-
दालचिनी आणि लवंग टाकून पाणी प्या, यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
-
प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असते. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
-
जायफळ मिक्स केलेलं दूध रोज रात्री प्यावे. हे दूध प्यायल्यानं शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.
-
मेथीचे पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
-
प्रसुतीनंतर तुम्ही ओव्याचं पाणी प्यायल्यानं बेली फॅट कमी होतो. हे पाणी दिवसभर प्यायल्यानं काही दिवसातच तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतील.
-
हायड्रेटेड राहण्यासाठी आणि पोट भरलेलं ठेवण्यासाठी दिवसभर पाणी प्या. जास्त चरबी कमी होण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या. (फोटो सौजन्य : pixabay )

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”