-
बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लूमुळे सर्वाधिक समस्या उद्भवतात. थंड वारे, वाढते प्रदूषण आणि खाण्याच्या अयोग्य सवयींमुळे सर्दी-खोकला फार त्रासदायक ठरतो.
-
ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना सर्दी आणि फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. याउलट मजबूत प्रतिकारशक्ती सर्दी आणि खोकल्याविरूद्ध लढण्यास मदत करते.
-
जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार आले, हळद आणि दालचिनी यांसारख्या विशिष्ट मसाल्यांमधील अर्कांची रासायनिक संरचना आणि अँटिऑक्सिडंट क्षमता सर्दीवर सर्वोत्तम उपचार आहे.
-
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी त्यांच्या पुस्तकात या मसाल्यांच्या उपयुक्ततेबद्दल सांगितले आहे.
-
हे मसाले सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास कशी मदत करतात हे जाणून घेऊया.
-
मुनमुन गनेरीवाल यांच्या मते, हे सर्व मसाले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते शरीरासाठी फायदेशीर असणारे बॅक्टेरिया वाढवतात आणि शरीराला हानी पोहोचवणारे बॅक्टेरिया कमी करतात.
-
जेवणात या मसाल्यांचे सेवन केल्याने शरीराला फायदा होतो.
-
या मसाल्यांचा वापर करण्याचा एक मार्ग म्हणजे हर्बल टी. यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
-
संशोधनानुसार, या मसाल्यांमधील दाहक-विरोधी गुणधर्म लठ्ठपणा, नैराश्य, हृदयविकार, मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि इतर अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरतात.
-
हर्बल चहा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या मसाल्यांमध्ये पुदिना, आले, हळद यांचा समावेश होतो.
-
हर्बल चहा बनवण्याचे साहित्य : १.५ कप पाणी, एक टीस्पून सुंठ पावडर, चिमूटभर काळी मिरी पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, एक टीस्पून तूप, चवीनुसार गूळ.
-
हा हर्बल चहा बनवण्यासाठी तुम्ही सर्व मसाले दीड कप पाण्यात टाकून दहा मिनिटे उकळा. यानंतर चहा गाळून घ्या आणि कोमट प्या.
-
गनेरीवाल यांच्या मते, हळदीचा चहा सर्दी-खिकल्यावरील औषध म्हणून काम करतो. हे पेय रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि हंगामी ऍलर्जी नियंत्रित करते.
-
दिवसातून एकदा आणि आठवड्यातून दोनदाच हे पेय प्यावे, असे गनेरीवाल यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”