-
यकृत हे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या रक्तामधील विषारी घटक काढून टाकण्यापासून पचनाला चालना देणे आणि शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व गोळा करण्याचे काम यकृत करते. (Photo : freepik)
-
त्यामुळेच जर शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम आपले यकृत निरोगी ठेवणेही अतिशय आवश्यक आहे. (Photo : Pexels)
-
अशा परिस्थितीत यकृत निरोगी राखण्यात कोणकोणते पदार्थ आपल्याला मदत करू शकतात, हे जाणून घेऊया. (Photo : Pexels)
-
व्हीटग्रासमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अमीनो अॅसिड असतात. हे रक्तदाब कमी करते आणि शरीरातील हाय मेटाबॉलिज्म वाढवते. (Photo : Pexels)
-
बीटच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रेट्स आणि बीटालेन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. (Photo : Pexels)
-
हे यकृतातील ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि जळजळ कमी करण्यास मदत करते, तसेच नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एन्झाईम्स वाढवते. (Photo : Pexels)
-
लाल आणि जांभळ्या द्राक्षांचे अनेक फायदे आहेत. यातील रेसवेराट्रोल, अँटिऑक्सिडंट पातळी वाढवते आणि जळजळ कमी करते. (Photo : Pexels)
-
ब्रोकोली आणि ब्रसेल्स स्प्राउट्ससारख्या क्रूसीफेरस भाज्या यकृतातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एन्झाईम्स वाढविण्यास मदत करू शकतात. (Photo : Pexels)
-
यामुळे यकृताला होणारे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते आणि ते एन्झाईम्सचे रक्त स्तर सुधारू शकते. (Photo : Pexels)
-
अक्रोडमध्ये सर्वात जास्त ओमेगा-६ आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड तसेच पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स असतात. (Photo : Pexels)
-
यामुळेच सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड हे फॅटी लिव्हरचे रोग कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. (Photo : Pexels)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (Photo : freepik)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO