-
महत्त्वाकांक्षी करिअरसाठी घड्याळाच्या पुढे धावावे लागते, यामुळे अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. इथूनच सुरु होतात वेगवेगळी दुखणी.
-
ऑफिसमध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या व्यक्ती या नेहमीच पाठदुखी, मानदुखी अशा तक्रारी करताना तुम्हीही पाहिले असेल. किंबहुना तुम्हालाही हा त्रास जाणवला असेल.
-
पाठदुखीमागे कारण म्हणजे बराच वेळ बसून राहिल्याने आपल्या शरीरातील हाडांना अजिबातच हालचाल मिळत नाही.
-
जर तुम्हाला कामामुळे अधिक मानसिक तणाव जाणवत असेल तर ही सततची चिंता तुमच्या पाठीच्या स्नायूंसाठी घातक ठरू शकते.
-
जर तुम्हाला सतत पाठदुखी जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा.
-
अशावेळी तुम्ही पाठदुखीवर उपाय म्हणून काय करू शकता हे आता आपण पाहणार आहोत.
-
पाठदुखी सुरुच होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यापासून सुरुवात करूयात. पाठीला दर थोड्या वेळाने थोडा व्यायाम द्या.
-
शरीराला स्ट्रेचिंगमुळे मोठा फायदा होतो. केवळ जागेवर उठून उभे राहा पायाच्या दिशेने एकदा उजवीकडे व डावीकडे वाकून स्ट्रेच करू शकता.
-
ब्रेक घ्या! सलग काम करताना अधूनमधून ब्रेक घेत राहा. बसल्या जागी थोडा व्यायाम करा. पाच स्टेप पुढे मागे चालून बघा.
-
तुम्ही बसल्या जागेवर एकदा उजवीकडे एकदा डावीकडे असं वळून साधा व्यायामही करू शकता. यावेळी कंबर किंवा पाठीला जोरात धक्का देऊ नका.
-
चहा- कॉफीचा बहाणा करून तुम्ही ब्रेक घेत असाल तर त्याऐवजी ग्रीन टी घ्यायला सुरुवात करा.
-
आपल्या हातातील व पायाच्या तळव्यातील मध्य भागी पाठीशी जोडलेले ऍक्युप्रेशर पॉईंट असतात, पाठदुखी होत असल्यास अलगद हाताने हे पॉईंट दाबू शकता.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”