-
अनेक लोकांसाठी चहा ही रोजच्या जेवणाप्रमाणेच अतिशय महत्त्वाची असते. किंबहुना त्याहूनही अधिक गरजेची असते, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
-
घरी पाहुणे आल्यावरही आपण त्यांना आधी चहा घेणार का? असे विचारतो.
-
चहाला अमृत मानणारे अनेक जण आपल्याकडे आहेत. चहा घेतल्याने तरतरी येते किंवा टॉनिक घेतल्यासारखे वाटते असे अनेकांचे म्हणणे असते.
-
मात्र, रिकाम्यापोटी घेतलेला चहा आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो.
-
काश्मिरमधील कावा, ग्रीन टी आणि लेमन टी यासारखा चहा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो.
-
आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी यांसारखे पदार्थ घालून केलेला आरोग्यदायी चहाही उत्तम.
-
मात्र, रिकाम्यापोटी चहा घेतल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. चहामुळे कोणते दुष्परिणाम होतात ते पाहूया…
-
रिकाम्या पोटी चहा पिण्याने पचनतंत्र बिघडते. पोट रिकामे असताना चहा घेतल्यास शरीरातील आम्ल अचानक उसळते.
-
यामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. अॅसिडिटीमुळे इतर अनेक समस्या उद्भवतात.
-
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील अग्नी मंदावतो. त्यामुळे पुढचा बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपण पोषणापासून वंचित राहतो. शरीराचे योग्य पोषण न झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होते.
-
चहा अती उकळलेला असल्यास तो आतड्यांसाठी आणि पोटातील इतर अवयवांसाठी चांगला नसतो.
-
चहामधील कॅफेन रिकाम्या पोटासाठी घातक असते. त्यामुळे शक्यतो रिकाम्या पोटी चहा घेणे टाळावे.
-
रिकाम्या पोटी चहा घेण्याची वेळ आलीच तर त्यासोबत बिस्कीट, टोस्ट, इत्यादी पदार्थ खावे. त्यामुळे त्रास कमी होतो.
-
अन्यथा पोटात किंवा श्वसन नलिकेत जळजळ होणे, उलटी येणे, जीव घाबरणे अशा समस्या उद्भवतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन