-
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी केली जाते.
-
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवाळीला आपले घर दिव्यांनी सजवून तुम्ही घराला आकर्षक लूक देऊ शकता.
-
घराला उत्तम लूक देण्यासाठी तुम्ही घराच्या भिंती, खिडक्या आणि दारांना लायटिंगदेखील लावू शकता.
-
फुलांनी घर सजावून घर दिव्यांनी सजवा.
-
फुलांनी घर सजावल्याने घर सुंदरही दिसेल आणि घरामध्ये एक छान सुगंधही दरवळेल.
-
छोट्या छोट्या काचेच्या ग्लासमध्येदेखील तुम्ही मेणबत्त्या सजवून ठेऊ शकता.
-
घराचे मुख्य गेट आणि अंगण आकर्षक करण्यासाठी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता.
-
दिवाळीच्या सजावटीची सुरुवात मुख्य दरवाजापासून होत असते. त्यात वरती फुलं आणि आंब्याची, अशोक वृक्षाच्या पानांनी तयार केलेले तोरण लावू शकता.
-
विविध रंगांच्या काचेच्या बाटलीत घातलेल्या लाईट्सच्या माळा घराला क्लासी लूक देतात.
-
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावा. यासाठी तुम्ही ताज्या फुलांचं किंवा आर्टिफिशिअर तोरणही लावू शकता.
-
अंगणात किंवा घराच्या वरच्या बाजूला आकाशदिवे लावा.
-
दिवाळीसाठी तुम्ही घरात लावता येणाऱ्या छोट्या शोच्या झाडांचा वापर करू शकता. अशी झाडे तुम्ही लाईट्सचा वापर करून देखील सजवू शकता. (फोटो साैजन्य-Pixabay)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन