-
प्रत्येक ऋतूत आरोग्याबरोबरच त्वचेची आणि केसांचीही काळजी घेणे गरजेचे असते. ऋतू बदलत असताना चेहऱ्यावर पुरळ आणि पिंपल्सची समस्या वाढते.
-
त्यातच आता दिवाळी हा सणही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं.
-
आज आपण घरच्या घरी बनवता येण्यासाख्या काही खास फेसपॅकबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतील तसेच त्वचेला उष्णतेपासून आराम देतील.
-
दही आणि बेसनाचा फेस पॅक त्वचेला आराम देतो. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसन थोड्याशा दह्यात मिसळून चांगले फेटून घ्या.
-
हा पॅक चेहऱ्यावर लावून कोरडे होईपर्यंत ठेवा. कोरडे झाल्यानंतर हा पॅक सामान्य पाण्याने धुवा. दही तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करेल आणि बेसन चेहऱ्याची चमक वाढवेल.
-
मुलतानी माती आणि गुलाबजल एकत्र करून पॅक तयार करा. पॅक चेहऱ्यावर लावून तो कोरडा होऊ द्या.
-
पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. मुलतानी माती आणि गुलाबपाणी दोन्ही तुमच्या चेहऱ्याला थंडावा देतील. त्याचबरोबर चेहऱ्याला चमक येईल.
-
तुम्हाला माहिती आहे का की चटणी बनवण्याव्यतिरिक्त फेस पॅक तयार करण्यासाठीही पुदिन्याचा वापर केला जाऊ शकतो.
-
पुदिन्याचा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला थंडावा देतो तसेच त्वचेचा रंग उजळतो.
-
पुदिन्याची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल.
-
चंदनाचा प्रभाव थंड असतो. चंदनात थोडेसे गुलाबजल मिसळून पॅक तयार करा, तो पॅक चेहऱ्यावर लावा.
-
पॅक लावल्यानंतर काही वेळ न बोलता शांत बसा. पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. या उपायाने त्वचेला थंडावा मिळेल आणि चेहरा उजळ दिसेल.
-
गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून काही वेळ कच्च्या दुधात भिजवा. त्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या.
-
हा पॅक सुकल्यानंतर चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. हा पॅक लावल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?