-
दिवाळी म्हटली की घरातील महिलांची खरेदी, साफसफाई, फराळ अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असते.
-
आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध.
-
फराळाचे पदार्थ म्हटले की ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवेत यासाठीही महिलांचा प्रयत्न सुरू असतो.
-
दिवाळीच्या फराळाचे अति प्रमाणात सेवन करणे ही अयोग्यच असते.
-
विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत स्वतःला या पदार्थापासून दूर ठेवणे अवघड असतं.
-
दिवाळीत रोजच्या जेवणातला आहार चौरस असायला हवा.
-
दिवसाळीचा फराळच खात बसू नका.
-
दिवसाळीचा फराळ बनविताना तेलाचा आणि साखरेचा वापर कमी करा.
-
दिवाळीत तेलापासून बनविलेले पदार्थ आणि थंडी यामुळे शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते.
-
जेवणाला पर्याय म्हणून फराळ करू नका.
-
अपचन, बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
-
दिवाळीच्या दिवसांत तुमचे आवडते पदार्थसुद्धा खा आणि आरोग्यही सांभाळा. (फोटो सौजन्य : pixabay)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”