-
दिवाळीची लगबग सर्वत्र सुरू आहे. दिवाळीला आपल्याकडे अनेक वस्तूंची खरेदी केली जाते.
-
दिवाळीच्या काळात आणि खासकरून धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. सोन्याची नाणी विकत घेतली जातात.
-
या दिवसांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
-
तुम्ही जेव्हा सोने खरेदी करण्यासाठी बाहेर जाताय त्यापूर्वी तुम्ही नेहमी सोन्याच्या किमती जाणून घ्या कारण ते वेळोवेळी बदलत असतात.
-
दिवाळी किंवा धनत्रयोदशी सोने खरेदी करताना विश्वासार्ह ठिकाणाहूनच सोने खरेदी करा.
-
तुम्ही सोने खरेदी करत असाल, तर खरे आणि खोटे सोने यात फरक करा.
-
सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क चिन्ह तपासा. खऱ्या-खोट्या सोन्याबरोबरच त्याची शुद्धताही ओळखते.
-
तुम्ही हिऱ्याचे दागिने हे कुठल्याही मोठ्या दुकानातून घेण्याएवजी एखाद्या छोट्या दुकानातून खरेदी करा आणि IGI सर्टिफिकेट देखील नक्की घ्या.
-
या धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर पक्के बिल घ्या.
-
जर तुम्ही कुठले महाग रत्न खरेदी करत आहात तर त्याच्या कॉलीटीचे सर्टिफिकेट देखील घ्या. त्यासोबतच त्या रत्नाची रिसेल किंवा बायबॅक वॅल्ह्यू देखील माहित करून घ्या.
-
सोने खरेदी करताना, तुमच्या सोन्यात किती सोल्डर आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
-
खरेदी करताना थोडं सावध होऊन त्यांच्या शुद्धतेची तपसणी करूनच खरेदी करा. (फोटो सौजन्य : Freeimages)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन