-
युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. ही समस्या ५० वर्षे अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त दिसून येते.
-
मात्र खराब आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार आता लहान वयाच्या लोकांना देखील होत चालला आहे.
-
यूरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे एकप्रकारचे विष आहे, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
-
यूरिक ऍसिड वाढण्यासाठी आहारातील प्युरिनयुक्त पदार्थ पूर्णपणे जबाबदार असतात. रेड मीट, ऑर्गन मीट, सीफूड यासारख्या गोष्टी खाल्ल्याने युरिक ऍसिडचे प्रमाण झपाट्याने वाढते.
-
अल्कोहोलच्या सेवनाने देखील युरिक ऍसिडची पातळी वाढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
-
युरिक अॅसिड असलेले रुग्ण दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात अनेकदा प्युरीनयुक्त पदार्थ टाळतात, परंतु स्नॅक्समध्ये काही पदार्थ खातात ज्यामुळे यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. चला जाणून घेऊया स्नॅक्समधील कोणते पदार्थ यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी विषासारखे सिद्ध होतात.
-
दिवसभरात कधीही भूक लागली की अनेकांना सवय असते ती म्हणजे बिस्किटे खाण्याची. निरोगी व्यक्तीसाठी बिस्किटांचे सेवन फायदेशीर आहे, परंतु ज्यांना यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी ते त्रास वाढवू शकते.
-
कोणत्याही प्रकारचे यीस्ट यूरिक ऍसिड वाढवू शकते. ज्या लोकांना यूरिक ऍसिड जास्त आहे त्यांनी बिस्किटे खाऊ नयेत.
-
त्यामध्ये जास्त प्रमाणात प्युरीन आणि फ्रक्टोज नसतात, परंतु यात कमी पोषक घटक असतात जे यूरिक ऍसिड वाढवू शकतात.
-
चॉकलेट आणि चिप्सचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते.
-
चॉकलेट दुधापासून बनवले जाते जे अजिबात खाऊ नये. याच्या सेवनामुळे युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढते.
-
तळलेले पदार्थ आणि जंक फूडच्या सेवनाने युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढू शकते. तळलेले चिप्स आणि पापड खाल्ल्याने युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढते.(सर्व फोटो: संग्रहित)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन