-
हिवाळा जसजसा जवळ येत आहे तसतशी त्वचाही कोरडी पडू लागली आहे.(फोटो: फ्रीपीक)
-
जर तुम्ही तुमच्या बोटाने कोरड्या त्वचेवर रेषा काढली तर ती तुम्हाला पांढऱ्या खडूसारखी दिसू लागेल. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे.(फोटो: संग्रहित)
-
हिवाळ्यात कधीकधी मॉइश्चरायझर देखील त्वचेला पुरेसा ओलावा देऊ शकत नाही. मॉइश्चरायझर लावून सुद्धा शरीरावर कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे या ऋतूत शरीराला तेल लावणे फायदेशीर ठरते.(फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
आज आम्ही तुम्हाला अशा चार तेलांबद्दल माहिती सांगजार आहोत ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.(फोटो: संग्रहित)
-
हिवाळ्यात आंघोळीनंतर या तेलाने मसाज केल्यास तुम्हाला कोरड्या त्वचेपासून नक्की सुटका मिळेल.(फोटो: संग्रहित)
-
सर्व प्रकारच्या त्वचेचे लोक बदामाचे तेल अंगावर लावू शकतात. गोड बदाम तेल सुगंधी आणि सौम्य दोन्ही असते.(फोटो: संग्रहित)
-
आंघोळीनंतर अंगावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तुम्हाला हवे असल्यास आंघोळीच्या वेळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी बदामाच्या तेलात ब्राऊन शुगर मिसळून बॉडी स्क्रबही बनवू शकता.(फोटो: संग्रहित)
-
त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा विशेष वापर केला जाऊ शकतो. हे तेल भेगा पडलेल्या त्वचेला बरे करते, त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कपड्यांमुळे त्वचेवर जाणवणारी खाजही निघून जाते.(फोटो: संग्रहित)
-
या तेलाचा वापर तुम्ही मेकअप काढण्यासाठी आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी देखील करू शकता.(फोटो: संग्रहित)
-
नारळाचे तेल त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाते, ज्यामुळे कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी ते सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे.(फोटो: संग्रहित)
-
यातील अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर ठेवतात. अशा स्थितीत आंघोळीनंतर हे तेल अंगावर लावता येते.(फोटो: संग्रहित)
-
खोबरेल तेल चेहऱ्यावर लावणे आवश्यक नाही, आपण हे तेल हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर वापरू शकता. त्याच वेळी, जर तुम्हाला मुरुम आणि खूप तेलकट त्वचा असेल तर हे तेल लावणे टाळा.(फोटो: संग्रहित)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना