-
लिपस्टिक ही प्रत्येक स्त्रीची बेस्ट फ्रेंड असते पण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
-
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या माहितीनुसार जेव्हा लिपस्टिकमधील रसायने तोंडमार्फत पोटात प्रवेश करतात तेव्हा अनेक पोटांचे विकार बळावण्याची शक्यता असते.
-
लिपस्टिक खराब येऊ नये यासाठी अनेक रासायनिक घटक वापरलेले असतात यामुळे ऍलर्जीचा धोका असतो.
-
लिपस्टिक मधील रसायनांमुळे केवळ ओठच नव्हे तर डोळे, नाक व चेहऱ्याच्या त्वचेवरही परिणाम दिसू शकतो.
-
लिपस्टिकमध्ये असणाऱ्या बिस्मथ ऑक्सिक्लोराईडमुळे ओठांना खाज सुटणे, ओठाच्या आजूबाजूची त्वचा लाल होणे असे त्रास होऊ शकतात.
-
लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅडमियम असल्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका असतो.
-
लिपस्टिक मध्ये असणाऱ्या मँगनीज व लीड मुळे ओठ सुकण्याची व ओठातून रक्त येण्याची समस्यां जाणवू शकते.
-
लिपस्टिक मधील लीड मुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी आयुर्वेदिक लिपस्टिकचा नक्कीच विचार करावा.
-
अलीकडे बाजारात अनेक हर्बल म्हणजेच आयुर्वेदिक घटकांपासून बनलेल्या लिपस्टिक उपलब्ध आहेत.
-
जर आपल्याला ऍलर्जीचा धोका टाळायचा असेल तर या हर्बल लिपस्टिक नक्कीच विचारात घेऊ शकता.
-
जेव्हा आपण लिपस्टिक वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. लिपस्टिक आधी बेस म्हणून ओठांवर लीप बाम लावणे फायद्याचे ठरू शकते.
-
लिपस्टिक लावून कधीच झोपू नये. मेकअप उतरवताना साधं तूप लावून ओठांना सुरक्षित ठेवू शकता.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख