-
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा पावसाळ्या नंतरचा आहे. या महिन्यात प्रामुख्याने पाणी भरपूर ठिकाणी साचलेले दिसून येते.
-
साचलेल्या पाण्यामुळे डासांचा संसर्ग झपाट्याने होण्याची शक्यता असते. त्याचवेळी व्हायरल इन्फेक्शन सुद्धा पसरू शकते.
-
यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
-
तर आज आपण जाणून घेऊया अशा काही आजारांबद्दल हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या काळात पसरतात.
-
त्यामधील सर्वात पहिला आजार म्हणजे डेंग्यू. सध्या डेंग्यूच्या रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.
-
एडीज नावाच्या डासाच्या चावल्याने डेंग्यू हा आजार होतो. या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर समस्या गंभीर होण्याची शक्यता असते.
-
दुसरा गंभीर आजार आहे मलेरिया.
-
मलेरिया आजारामुळे रुग्णाला ताप, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखा त्रास होतो.
-
या आजाराची सुरवातीची लक्षणे दिसताच, यावर योग्य उपचार केल्यास, हा आजार बरा होतो.
-
तिसरा आजार म्हणजे व्हायरल ताप. हा काळात व्हायरल तापाचे रुग्ण भरपूर दिसतात. डेंग्यू प्रमाणे या आजारामुळे देखील भरपूर ताप, उलट्या, अंगदुखी या समस्या होऊ शकतात.
-
चौथा आजार आहे चिकनगुनिया. हा आजार डासांच्या चावल्याने होतो. हा आजारामुळे अंग सुजणे, ताप यांसारखी समस्या होऊ शकतात.
-
त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणारे हे आजार वेळीच ओळखून यावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे. समस्या गंभीर होण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने समस्येपासून सुटका मिळू शकते.(सर्व फोटो: संग्रहित)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल