-
डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात, म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात त्यांचा अनेक प्रकारे समावेश केला जातो.
-
डाळींमधील पौष्टिक घटकांमुळे याला अनेकदा सुपर फूडचा दर्जा दिला जातो.
-
सामान्यत: प्रथिनांची गरज भागवण्यासाठी डाळी खाल्ल्या जातात, परंतु त्याच्या सेवनाने शरीराला भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
-
आज आपण पाच प्रकारच्या डाळींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी होते आणि वजन कमी करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
-
मूग तुम्ही डाळीच्या स्वरूपात किंवा मोड आणून खाऊ शकता. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतात.
-
तसेच मुगामध्ये चरबी आणि कॅलरीज कमी आढळतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी होते. म्हणूनच मुगाचा नियमित आहारात समावेश करावा.
-
मसूराची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच अनेकांना ती खायला खूप आवडते.
-
यामध्ये असलेले प्रथिने आणि फायबर कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करतात. त्याबरोबरच यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडेही मजबूत होतात.
-
भारतात सर्वाधिक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या डाळींच्या यादीत उडदाचा समावेश आहे. हे केवळ कोलेस्टेरॉल आणि वजन कमी करण्यास मदत करत नाही तर ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठीदेखील हे फायदेशीर आहे.
-
काबुली चण्यांचा वापर डाळीच्या स्वरूपात कमी आणि छोले भाजीच्या स्वरूपात जास्त केला जात असला तरीही ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
-
मात्र चणे शिजवताना कमीत कमी तेलाचा वापर करावा, अन्यथा कोलेस्ट्रॉल कमी होण्याऐवजी वाढू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Freepik)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन