-
Weekly Rashibhavishya: ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या आठवड्यात १२ राशींचे भविष्य कसे असणार जाणून घेऊयात..
-
या आठवड्यात बुध, मंगळ, शनि मार्गी होऊन सर्वच राशींसाठी प्रभावशाली योग तयार करू शकतात..
-
मेष: मेष राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनिश्चित खर्चांमुळे बजेट थोडे बिघडू शकते. जर आपण गुंतवणूक केली असेल तर त्या कंपनीचे किंवा बँकेचे व्यवहार तपासून पाहणे हिताचे ठरेल. जोडीदारासह थोडा वाद होण्याची शक्यता आहे.
-
वृषभ: वृषभ राशीसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. व्यवसायात मंदी असू शकते त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करणे हिताचे ठरेल. व्यवसाय व वैवाहिक दोन्ही पार्टनरसह मतभेद होण्याची शक्यता आहे.
-
मिथुन: ३० ऑक्टोबरला मिथुन राशीत मंगळ वक्री होणार असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी संधी आहे. गुंतवणुकीत नीट लक्ष दिल्यास फायदा होऊ शकतो. वैवाहिक आयुष्य सुखद राहण्याचे योग आहेत.
-
कर्क: कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नशिबाची साथ लाभू शकते. व्यवसाय किंवा नोकरीत आपल्याला प्रगतीची संधी आहे. अचानक कोर्टाच्या फेऱ्या होऊ शकतात. कौटुंबिक सुखाचे योग आहेत.
-
सिंह: सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याच्या शेवटी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. नवीन नोकरी शोधत असल्यास हा आठवडा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो.
-
कन्या: कन्या राशीच्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः गळा व फुफ्फुसे जपावेत. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत मात्र यामुळे आपले बजेट थोडे बिघडू शकते.
-
तूळ: आठवड्याच्या शेवटी तुमचे धन थोडे जपून ठेवावे लागू शकते. मंगळाच्या प्रभावाने अनपेक्षित लाभ होऊ शकतो. जुने मित्र भेटण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या आजारामुळे तुमचे मानसिक आरोग्य तणावात राहू शकते.
-
वृश्चिक: हा आठवडा तुमच्यासाठी उन- सावलीचा असणार आहे. नोकरदारांना आर्थिक मिळकतीचे बाह्य स्रोत मिळू शकतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीचे योग आहेत.
-
धनु: आठवड्याच्या सरतेशेवटी आर्थिक लाभाचे योग आहेत. कोर्टाचे खटले तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या लहानसहान तक्रारी येऊ शकतात मात्र जोडीदाराच्या साथीने तुम्ही आनंदी राहू शकाल.
-
मकर: मकर राशीच्या विद्यार्थ्यांना प्रगतीचे योग आहेत. इंटर्नशिप किंवा पार्ट टाइम कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शिक्षण, बँकिंग व मीडिया क्षेत्रातील प्रगतीच्या संधी आहेत.
-
कुंभ: हा आठवडा रोलरकोस्टर प्रमाणे असू शकतो. सुरुवातीला खर्च वाढून आठवड्याच्या शेवटाला लाभाची संधी आहे. कर्ज देणे टाळावे. तुमच्या जोडीदारासह प्रवासाचे योग आहेत.
-
मीन: संतती सुखाचे योग आहेत, अडकून राहिलेल्या कामात जोर लावण्याची गरज आहे. आर्थिक जबाबदारी वाढू शकते. जोडीदारांच्या इच्छांचा आदर न ठेवल्यास भांडण होऊ शकते.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”