-
Height & Weight Chart: दिवाळीनंतर आपलेही वजन काही किलो वाढले असल्यास पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येक ‘आज’ पासून सुरुवात करणे फायद्याचे ठरेल.
-
तुमच्या उंचीनुसार नेमके तुमचे वजन किती असावे हे सांगणारी सरासरी आकडेवारी आज आपण पाहणार आहोत.
-
जर आपली उंची ४ फूट १० इंच असेल तर साधारण आपले वजन ४१ ते ५२ किलो गटात असायला हवे.
-
जर आपली उंची ५ फूट असेल तर आपले वजन ४४ ते ५७ किलो गटात असायला हवे
-
जर आपली उंची ५ फूट २ इंच असेल तर ४९ ते ६३ किलो या गटात आपले वजन असायला हवे.
-
५ फूट ४ इंच उंची असणाऱ्या मंडळींनी ४९ ते ६३ किलो या गटात आपले वजन नियंत्रित ठेवणे हिताचे ठरते
-
५ फूट ६ इंच उंच मंडळींचे उत्तम आरोग्यासाठी ५३ ते ६७ किलो इतके वजन असणे फायद्याचे ठरते.
-
५ फूट ८ इंच उंचीच्या मंडळींनी ५६ ते ७१ किलो गटात आपले वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
-
५ फूट १० इंच उंचीच्या मंडळींना ५९ ते ७५ किलो हातात आपले वजन नियंत्रित ठेवल्यास सततच्या आजारांपासून आराम मिळू शकतो.
-
६ फूट व त्याहून अधिक उंच व्यक्तींनी ६३ ते ८० किलो गटात वजन नियंत्रित ठेवणे फायद्याचे ठरू शकते.
-
टीप : लक्षात घ्या हे मोजमाप केवळ आपल्या माहितीसाठी आहे. याच मापात बसण्यासाठी आरोग्याची हेळसांड करू नये.
-
तसेच महिला व पुरुष दोघांसाठी हे मोजमाप वेगवेगळे असू शकते वरील आकडेवारी ही महिलांच्या अनुषंगाने देण्यात आलेली आहे.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच