-
अंकांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीसाठी एखादा आकडा शुभ असतो तर एखादा अशुभ.
-
अंकशास्त्रात १ ते ९ अंकांचे वर्णन केले आहे. तसेच, या अंकांवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे अधिपत्य असते.
-
आज आपण शनिदेवाशी संबंध असणाऱ्या मूलांक ८ बद्दल जाणून घेणार आहोत.
-
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला आहे, अशा लोकांचा मूलांक ८ असतो.
-
अंकशास्त्रानुसार हे लोक रहस्यमय आणि न्यायप्रिय असतात. त्यांना नशिबापेक्षा त्यांच्या कर्मावर जास्त विश्वास असतो आणि ते हातात घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात.
-
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ८ आहे, अशा लोकांना दिखावा करणे अजिबात आवडत नाही.
-
त्याचबरोबर हे लोक कष्टाळू आणि मेहनती असतात. या लोकांना त्यांच्याबद्दल वाईट बोललेले आवडत नाही. त्यांना खूप लवकर राग येतो.
-
हे लोक फार भाग्यवान नसतात. पण वयाच्या ३० वर्षांनंतर त्यांचे नशीब अचानक बदलते. त्यांना जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. पण ते कधीही मागे हटत नाहीत.
-
तसेच हे लोक नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगल्या प्रकारे करण्यात पटाईत असतात.
-
मूलांक ८ असणाऱ्या लोकांना लोह, पेट्रोल, खनिजे, तेल याच्याशी निगडित कामात चांगले यश मिळू शकते.
-
दुसरीकडे, मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी शनिवार आणि शुक्रवार खूप शुभ मानले जातात. या दिवशी काम सुरू केल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे म्हटले जाते.
-
मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी हलका निळा आणि काळा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी ते काळे आणि निळे कपडे घालू शकतात.
-
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ८ आहे, ते बचत करण्यात निपुण असतात आणि त्यांचा बँक बॅलन्स चांगला असतो.
-
त्याच वेळी, हे लोक लगेचच कोणत्याही गोष्टीवर पैसे खर्च करत नाहीत. ते खर्च करण्यापूर्वी खूप विचार करतात. यामुळेच त्यांना बहुतेकवेळा पैशांची कमतरता भासत नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels/Pixabay)

Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video