-
वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. बदललेली जीवनशैली, बैठी कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडीमार या कारणांमुळे वजन लगेच वाढते.
-
वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
-
यासाठी जेवणावर नियंत्रण ठेवणे, डाएट, व्यायाम असे पर्याय निवडले जातात. काही पदार्थांचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास ते नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत करतात, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
-
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळते ज्यामुळे पचनक्रिया नीट होण्यास मदत मिळते, तसेच यामुळे कॅलरी बर्न होण्यासही मदत होते.
-
डार्क चॉकलेटमुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल, पण त्यामुळे वजन वाढण्याची भीती असेल तर यावर पर्याय म्हणून तुम्ही मर्यादित प्रमाणात चॉकलेटचे सेवन करू शकता.
-
शेंगदाणे, बदाम, अक्रोड : शेंगदाणे, बदाम, अक्रोड अशा पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, मॅग्नेशियम, प्रोटीन्स अशी पोषकतत्वे आढळतात.
-
तसेच हे पदार्थ भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-
सफरचंद : सफरचंदामध्ये फायबर जास्त प्रमाणात तर कॅलरी कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
-
तसेच सफरचंद खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरू शकते.
-
अंडी : अंडी अनेक मिनरल्स, विटॅमिन, प्रोटीन यांचे उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे दररोज नाश्त्यामध्ये अंडयांचा समावेश केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते.
-
जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात अंडी खाल्ली तर तुम्हाला दिवसभरातील कामं करण्यासाठी ऊर्जा मिळेल तसेच लवकर भूकही लागणार नाही, यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळेल.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.) (सर्व फोटो सौजन्य : Freepik)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?