-
Heart Attack Early Symptoms: सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीरचं आज वयाच्या ४६ व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.
-
यापूर्वीही कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्येच व्यायाम करताना कार्डियाक अरेस्ट आला होता, महिनाभर मृत्यूला झुंज देऊन अखेरीस श्रीवास्तव यांचे निधन झाले होते.
-
काही दिवसांपूर्वी साऊथ कोरिया येथे हॅलोविन पार्टीत सुद्धा चेंगराचेंगरी दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने तब्बल ५० जणांचे दुर्दैवी निधन झाले होते.
-
यावरून अनेकांना आता हृदय विकाराच्या संबंधित प्रश्न पडू लागले आहेत. आज आपण शरीरात हार्ट अटॅकचे लवकर दिसणारे संकेत पाहणार आहोत.
-
हार्टअटॅक येण्याआधी शरीरातील काही अववयवांना नेहमीपेक्षा खूप जास्त घाम फुटतो.
-
हार्टअटॅकच्या वेळी येणारा घाम हा मुख्यतः मान, गळा व चेहऱ्यावर ओठांच्या अवतीभोवती येऊ लागतो.
-
मेयो क्लिनिकच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखणे जाणवू शकते. मात्र हार्ट अटॅक येण्याआधीही महिनाभर छातीत कळ येण्याची तक्रार जाणवू शकते.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी चक्कर येण्याचा त्रास उद्भवू शकतो.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही दिवस छातीत सतत धडधडणे, जीव घाबरल्यासारखा होणे असे त्रास जाणवू शकतात.
-
सतत थकवा जाणवणे, झोप येणे हे सुद्धा हृदयविकाराशी संबंधित अपायकारक लक्षण आहे.
-
हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही दिवस छातीत सतत धडधडणे, जीव घाबरल्यासारखा होणे असे त्रास जाणवू शकतात.
-
अनेकांना धाप लागणे, दम लागणे असे त्रास जाणवतात. मात्र वारंवार श्वास घेण्यात अडचण येत असल्यास हृदयविकाराशी संबंधित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल