-
मशरूम ही शाकाहारी लोकांची आवडती भाजी मानली जाते. तसेच मशरूम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शरीराला अनेक पोषक तत्वेदेखील पुरवते.
-
मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करण्याची शिफारस डॉक्टरही करतात.
-
मशरूममध्ये प्रथिने, बीटा कॅरेटीन आणि ग्लूटेन यासारखे सूक्ष्म पोषक घटक असतात, जे अनेकदा इतर पदार्थांमध्ये आढळत नाहीत.
-
म्हणूनच असंतुलित हार्मोन्सचा त्रास असलेल्या मुलांसाठी मशरूम खाणे फायदेशीर आहे.
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी मशरूम खूप फायदेशीर आहे.
-
यामध्ये आढळणारे बीटा-ग्लुकन आणि फायबर मधुमेह आणि रक्तदाबावर फायदेशीर ठरतात.
-
मशरूममध्ये असलेले पोषक तत्त्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
-
बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवते. अनेकांना वजन कमी करायचे असते पण ते करू शकत नाहीत.
-
अशावेळी मशरूम खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज कमी होतात.
-
मशरूम खाणे पोटासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात.
-
चांगले बॅक्टेरिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तसेच ते आतड्याला योग्य पोषण देतात.
-
मशरूममध्ये व्हिटॅमिन डीदेखील मुबलक प्रमाणात असते, जे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते आणि आपल्याला निरोगी ठेवते.
-
त्यात व्हिटॅमिन डी २ असते जे एकदा खाल्ल्यानंतर व्हिटॅमिन डी ३ मध्ये बदलते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)
-
हेही पाहा: Photos: राजकारणात प्रवेश केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या पत्नीने बदलला लूक; पाहा रिवाबाचं क्लासिक साडी कलेक्शन
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?