-
Shani Margi and Mangal Gochar 2023: वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. जी त्यांची मूळ त्रिकोण राशी मानली जाते. तर ग्रहांचे सेनापती मानले जाणारे मंगळदेव १३ मार्च पर्यंत वृषभ राशीत विराजमान राहणार आहेत.
-
शनि व मंगळ हे दोन अत्यंत बलवान ग्रह मानले जातात परिणामी येत्या नववर्षात सर्वच १२ राशींवर शनि व मंगळाच्या स्थितीचा परिणाम दिसून येणार आहे. यात तुमच्या राशीला नेमका फायदा होणार की नुकसान हे आपण जाणून घेणार आहोत..
-
मेष: मंगळ ग्रह वृषभ राशीत असल्याने मेष राशीला काहीश्या संकटाच्या झळा सोसाव्या लागू शकतात. विशेषतः लग्न जुळण्याच्या बाबत काही समस्या येऊ शकतात. अशावेळी शक्य तितकं मन व डोकं शांत ठेवणं हिताचं ठरेल. शनि तुमच्या प्रभाव कक्षेपासून दूर असल्याने काहीसा आराम मिळू शकतो.
-
वृषभ: वृषभ राशीसाठी मंगळ गोचर लाभदायी असण्याची शक्यता आहे, येत्या काळात आपल्याला आर्थिक उलाढाली जपून केल्यास बक्कळ पैसे कमावण्याची संधी आहे. शनिदेव तुमच्या राशीतून चौथ्या भावात भ्रमण करतील. म्हणूनच कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला फळ मिळेल
-
मिथुन: शनिदेव तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात प्रभावी असणार आहे, तर मंगळ १२ व्या स्थानी स्थिर असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होऊनही पैसे टिकतील का याबाबत निश्चिती नाही. कदाचित कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते.
-
कर्क: कर्क राशीच्या मंडळींनीचुकूनही भावुक होऊन निर्णय घेऊ नयेत. विशेषतः पैशाच्या गुंतवणूकीत एक नव्हे तर चार वेळा विचार करावा. तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग मोकळे होऊ शकतात यावेळी भीती किंवा घाईत निर्णय घेणे टाळा.
-
सिंह: सिंह राशीसाठी मंगळ व शनि दोन्ही ग्रहांचे संक्रमण शुभ ठरू शकते. मंगळ आपल्या राशीत दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. तर शनि सुद्धा भाग्योदयाच्या स्थितीत आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून स्तुती होऊ शकते परिणामी तुम्हाला प्रमोशन व पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
-
कन्या: कन्या राशीत शनिचा प्रभाव कठोर व मंगळ शुभ स्थानी असल्याने संमिश्र परिणाम दिसून येतील. या व्यक्तींना घरगुती वाद टाळायला हवेत, अन्यथा त्याचे पडसाद कामाच्या ठिकाणी उमटू शकतात. तुम्हाला यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात.
-
तूळ: शनिदेव तुमच्या राशीच्या पाचव्या भावात भ्रमण करतील, नवीन वर्षी तुम्ही तुमच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ पाहू शकता. मात्र आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आईसह वाद होण्याची शक्यता आहे.
-
वृश्चिक: वृश्चिक राशीत बुध व गुरु यांचा प्रभाव मजबूत आहे परिणामी मंगळ व शनि यांचा किंचित प्रभाव इतका परिणामकारक ठरणार नाही. वृश्चिक राशीच्या मंडळींना नववर्षात सुरुवातीचे काही आठवडे वगळताच आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत.
-
धनु; धनु राशीच्या मंडळींसाठी मंगळ व शनिचे संक्रमण नुकसानकारक ठरू शकते. तुमच्या वाहनांची काळजी घ्या तसेच प्रवासातही विशेष काळजीपूर्वक वागा. अनेकदा अडचणी सुप्त असतील त्यामुळे सावधान राहणे हिताचे ठरेल
-
मकर: तुमचे मित्रच तुमचे शत्रू ठरू शकतात, मित्रांमुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण काही काळ एकांतात आनंद शोधायला हवा. शनिदेव हे तुमच्या राशीचे धनी मानले जातात, परिणामी मंगळ गोचर झाल्यासही आपल्याला फार चिंता करायची गरज भासणार नाही.
-
कुंभ: शनिदेव या वर्षी तुमच्या पारगमन राशीच्या लग्न घरामध्ये भ्रमण करतील. २०२३ च्या वर्षात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळ गोचरामुळे आपल्याला जोडीदाराच्या बाबत मात्र काही तक्रारी सहन कराव्या लागू शकतात.
-
मीन: तुमच्या जोडीदाराला प्राधान्य देणे हिताचे ठरेल. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत असल्याने वैवाहिक कलह वाढू शकतात मात्र यावेळी तुमच्या मनाचा कौल घ्या. शनि देव तुमच्या राशीसाठी प्रभावशाली ठरू शकतात यामुळे कामात १ टक्का अधिक मेहनत घ्यावी लागेल.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का