-
महिलांमध्ये ब्रा घालण्यावरून अनेक समज- गैरसमज असतात. यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रात्री झोपताना ब्रा घालू नये की घालावी.
-
दिवसभर ब्रा घातल्याने अस्वस्थ वाटणे साहजिक आहे पण स्तनांचा आकार बदलणार तर नाही ना या शंकेमुळे ब्रा काढायची इच्छा असूनही ती काढली जात नाही.
-
मात्र तुम्हाला माहित आहे का? तज्ज्ञाच्या मते रात्री ब्रा घालून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तर जाणून घेऊया रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपण्याचे दुष्परिणाम.
-
रात्रीच्या वेळी ब्रा घातल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा नेहमी काढणे कधीही चांगले आहे. ब्रा काढणे शक्य नसल्यास तुम्ही हूक सैल करू शकता.
-
दिवसभर ब्रा घातल्याने घामाचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे रात्रीही तुम्ही ब्रा घालून झोपलात तर स्तनांना मोकळी हवा मिळू शकत नाही. यामुळे त्याठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता उद्भवू शकते.
-
तुम्ही जर सतत ब्रा घालून राहिलात तर त्वचेवर डाग पडू शकतात. त्याठिकाणची जागा काळी किंवा लाल पडू शकते. तसंच त्याठिकाणी रॅश देखील येऊ शकतात.
-
तुम्ही घातलेली ब्रा घट्ट असेल तर अनेकदा स्तनांमध्ये गाठी होण्याची देखील शक्यता असते. या गाठी स्तनाच्या कर्करोगाच्या देखील असू शकतात.
-
त्यामुळे तुम्हाला जर ब्रा न घालता अवघडल्यासारखे होत असेल तर तुम्ही सैल ब्रा घालू शकता.
-
ब्रा जर घट्ट असेल तर श्वसनाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा काढून झोपणे कधीही चांगले आहे.(all photo: freepik, pexels)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा