-
Mangal Margi New Year: ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रह हा साहस व शौर्याचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो.
-
येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये १३ जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पाहायला मिळणार आहे.
-
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ३ राशींसाठी का कालावधी अत्यंत लाभदायी व शुभ ठरू शकतो. याकाळात खालील तीन राशींना प्रचंड धनलाभ व करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत.
-
कर्क राशीसाठी मंगळ ग्रहाचे मार्गीक्रमण लाभदायक ठरू शकते. मंगळ कर्क राशीत गोचर करून प्रभाव कक्षेत ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान आर्थिक फायद्याचे ठरू शकते.
-
कर्क राशीच्या महिला या काळात नवनवीन मार्गातून पैसे कमावू शकतात. तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात नवीन सुरुवात करू इच्छित असाल तर नक्कीच तुमच्या मनाचा सल्ला ऐकणे फायद्याचे ठरू शकते. गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत.
-
कन्या राशीच्या भाग्यात मंगळ ग्रहाचा वरदहस्त असू शकतो. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या नवव्या स्थानी विराजमान होणार आहे. हे स्थान भाग्योदयाचे मानले जाते. तुम्हाला परदेशवारीची संधी लाभण्याची शक्यता आहे.
-
तुम्हाला नातेसंबंध जपण्याची गरज आहे. कुणाचेही मन न दुखावता उलट गोड बोलून तुम्ही लाभ मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.
-
सिंह राशीसाठी मंगळाचे संक्रमण अच्छे दिन घेऊन येऊ शकतं. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत दशम स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान कार्यक्षेत्रातील प्रगतीशी संबंधित आहे.
-
सिंह राशीच्या व्यक्तीला नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, तसेच व्यवसायातही लाभ होऊ शकतो. जी कामे तुम्ही टाळत होतात त्यातूनच लाभ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यावर आधारित आहे)
-
(सर्व फोटो: संग्रहित/संपादित)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल