-
ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम हा आजार सामान्यतः एड्स या नावाने ओळखला जातो. हा आजार एखाद्या व्यक्तीला हळूहळू मृत्यूकडे नेतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, २०२१ सालापर्यंत जगभरात सुमारे ३.८ कोटी लोक एचआयव्हीशी झुंज देत होते.
-
गेल्या वर्षी जगात साडे सहा लाख लोकांचा एड्समुळे मृत्यू झाला होता. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी लाखो प्रकरणे नोंदवली जातात. जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घेऊया, कोणत्या चुकांमुळे एड्स पसरतो आणि या आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला आहे.
-
ह्युमन इम्युनो डिफिशियंसी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा हळूहळू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. एचआयव्ही शरीरातून CD4 पांढऱ्या पेशी कमी करू लागतो. जेव्हा पांढऱ्या पेशींची संख्या ५००- १६०० वरती क्युबिक मिलीमीटर वरून २०० प्रति क्युबिक मिलीमीटर इतकी खाली येते तेव्हा एड्सचे निदान होते व या शेवटच्या टप्प्यात योग्य उपचार न घेतल्यास मृत्यूही होऊ शकतो.
-
एचआयव्ही (HIV) आणि एड्समध्ये (AIDS) खूप फरक आहे. एचआयव्ही हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो रक्तातून लोकांच्या शरीरात पसरतो. हा संसर्ग शरीरात आला की तो आयुष्यभर राहतो.
-
काही लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात, परंतु त्यांना एड्स नसतो. असे लोक कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सामान्य आयुष्य जगू शकतात. व्हायरल लोडच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एचआयव्ही संसर्गाची व्याप्ती किती आहे हे तपासता येते.
-
जेव्हा हा विषाणूसंसर्ग शरीरात पसरल्याने फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचते, तेव्हा या स्थितीला एड्स म्हणतात. या संसर्गामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती निकामी होते आणि शरीराच्या विविध अवयवांचे नुकसान होऊ लागते.
-
एचआयव्हीवर योग्य वेळी उपचार केले तर एड्सची स्थिती आटोक्यात आणून टाळता येऊ शकते. आजच्या युगात अशी अनेक औषधे आहेत, जी या विषाणूवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकतात. लोकांनीही याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.
-
एड्ससंदर्भात आजही समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. सर्वात मुख्य म्हणजे एड्स हा केवळ असुरक्षित सेक्स केल्यानेच पसरतो असा अनेकांचा समज आहे, आजवर अनेक तज्ज्ञांनी हे वारंवार नमूद केले आहे की एड्स हा केवळ लैंगिक संबंधांनीच नव्हे तर नियमित आयुष्यातील काही चुकांमुळे सुद्धा होऊ शकतो.
-
डॉक्टरांच्या मते, एचआयव्ही संसर्ग रक्तातून पसरतो. रक्त संक्रमण, वापरलेली सिरिंज, इतर व्यक्तीचे ब्लेड, असुरक्षित लैंगिक संबंध ही एचआयव्ही पसरण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. समलैंगिक लोकांना याचा धोका जास्त असतो, कारण असे लोक एकमेकांच्या रक्ताच्या संपर्कात सहज येऊ शकतात.
-
जर अशा रुग्णाला हिरड्यांचा त्रास होत असेल आणि त्यातून रक्तस्त्राव होत असेल तर चुंबन घेतल्याने समोरची व्यक्ती एचआयव्ही संसर्गाचा बळी ठरू शकते. कोणत्याही प्रकारच्या ब्लेस टू ब्लड कनेक्शनमुळे हा संसर्ग पसरू शकतो. हस्तांदोलन करून किंवा एकत्र अन्न खाल्ल्याने एड्स पसरत नाही.
-
आजकाल अधिकाधिक तरुण या आजाराच्या विळख्यात येत आहेत. तथापि, लैंगिकदृष्ट्या सक्रिय लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. समलैंगिक लोकही सहज त्याला बळी पडू शकतात.
-
जे लोक रक्ताशी संबंधित काम करतात, त्यांनाही या आजाराचा धोका जास्त असतो. आश्चर्याची बाब म्हणजे काही चुकांमुळे लहान मुलेही एड्सची शिकार होत आहेत. म्हणूनच ते टाळणे फार महत्वाचे आहे.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा