-
मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. औषधांबरोबरच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही याचा आवर्जून वापर केला जातो.
-
आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही मध उपयुक्त असल्याने अनेकजण याचा वापर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये करतात.
-
मात्र त्वचेवर मध लावण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया.
-
मध लावण्याने आपली त्वचा स्वच्छ होत असली तरीही ते थेट त्वचेवर लावू नये.
-
त्वचेवर मध लावण्यापूर्वी त्यामध्ये गुलाबपाणी किंवा ऍलोव्हेरा जेल मिसळावे.
-
मध थेट त्वचेवर लावल्यास त्वचा चिकट होते.
-
त्वचेवर मध लावल्यानंतर केवळ २ ते ४ मिनिट मसाज करावा. जास्तवेळ मसाज करू नये.
-
त्वचेवर मध लावून जास्त काळ तसेच ठेवू नये. जास्तीत जास्त १५ ते २० मिनिट मध त्वचेवर ठेवावे.
-
यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून कोरडी करावी.
-
चेहऱ्यावर मध लावल्यानंतर चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचे तापमान योग्य आहे का याची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
चेहऱ्यावरील मध स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे मध त्वचेवरून सहज निघण्यास मदत होईल.
-
उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावलेले मध काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू शकता.
-
त्याचप्रकारे मधाचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर टोनर अवश्य लावावे. तर यावेळी स्क्रबचा वापर करू नये.
-
तसेच मध लावल्यानंतर कडक उन्हात बाहेर पडू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो: Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख