-
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक डायटिंग करण्याबरोबरच वर्कआउटही करतात. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट आहेत आणि लोक त्यांचे पालन करतात.
-
मात्र, काही लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात. पण ते त्यांचा आहार आणि जीवनशैली बदलत नाहीत. त्यामुळे त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही.
-
आरोग्य वेबसाइट हेल्थ लाइन आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकाल लोक जंक फूडचे अधिक सेवन करत आहेत, यामुळे वजन वाढते.
-
जर तुम्हालाही वजन वाढणे किंवा लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
अनेकांना जेवण करताना टीव्ही पाहण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर ती बदलायला हवी. डॉक्टरांच्या मते, टीव्ही पाहताना खाल्ल्याने तुमचे खाण्यापासून लक्ष विचलित होऊ शकते.
-
अशावेळी आपण जास्त अन्न खातो. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. टीव्ही पाहताना अनेकजण जंक फूडचे सेवन करतात. वजन कमी करायचे असेल तर जेवताना टीव्ही पाहणे बंद करा.
-
काही लोकांना गोड चहा पिण्याची सवय असते. साखरेच्या अतिसेवनाने शरीरातील साखर आणि चरबीचे प्रमाण वाढते. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.
-
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर गोड चहा पिणे टाळावे. विशेषतः फुल क्रीम दुधापासून बनवलेला चहा अजिबात पिऊ नये.
-
यामुळे तुमचे वजनही वाढू शकते. त्याचबरोबर स्वयंपाक करताना साखर मर्यादित प्रमाणात वापरावी.
-
अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि सकाळी उशिरा उठतात. अशा लोकांकडे वेळ कमी असतो. त्यामुळे ते नाश्ता करणे टाळतात. मग ऑफिसला गेल्यावर भूक लागल्यावर ते जंक फूड खातात. या सवयीमुळे वजन झपाट्याने वाढते.
-
तुम्हालाही अशी वाईट सवय असेल तर ती लगेच बंद करा. सकाळचा नाश्ता अजिबात टाळू नये. नाश्त्यामध्ये फळे आणि फायबरयुक्त पदार्थ खा.
-
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. तुम्हालाही तुमचे वाढते वजन नियंत्रित करायचे असेल तर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा.
-
हे चयापचय वाढवते आणि शरीरातील विषारी पदार्थ देखील काढून टाकते. यासोबतच पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: Freepik)
-
हेही पाहा: Photos: चेहरा उजळ बनवण्यासाठी मध लावताय? मग ‘या’ खबरदारी अवश्य घ्या

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा