-
गेल्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५०ने विक्रमी उच्चांक गाठला. आता पुढच्या आठवड्यात आरबीआय एमपीसीचा परिणाम बाजारावर दिसून येईल.
-
वैयक्तिक समभागांबद्दल सांगायचं झाल्यास, आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी टाटा स्टील, एसबीआय आणि ओएनजीसीसह पाच समभागांवर दावा केला आहे.
-
त्यांच्या म्हणण्यानुसार, या समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील आठवड्यात आठ टक्क्यांहून अधिक नफा मिळू शकतो. या सर्व समभागांसाठी टार्गेट प्राइज आणि स्टॉप लॉस तपशील पाहुयात.
-
जगातील पाचवी सर्वात मोठी स्टील कंपनी टाटा स्टीलमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुमारे सात टक्के नफा कमवू शकता. त्यांच्या शेअर्सची किंमत सध्या ११२.०५ रुपये आहे. (Reuters)
-
यामध्ये १०४ रुपये स्लॉट लॉससह १२० रुपयांच्या टार्गेट प्राइजवर गुंतवणूक करता येईल. टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
-
सरकारी तेल आणि वायू कंपनी ओएनजीसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही पुढील आठवड्यात सुमारे आठ टक्के नफा कमवू शकता. त्यांच्या शेअर्सची किंमत सध्या १४०.८५ रुपये इतकी आहे. १५२ रुपयांच्या टार्गेट प्राइजसह यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. गुंतवणुकीसाठी १३२ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.
-
कंप्यूटर सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपनी टेक महिंद्राचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत २.५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत आणि पुढील आठवड्यात ते सुमारे ६ टक्क्यांनी वाढू शकतात.
-
त्यांच्या शेअर्सची किंमत सध्या १११४.५५ रुपये आहे. तुम्ही यामध्ये १०५५ रुपयांच्या स्टॉप लॉससह आणि ११८० रुपयांच्या टार्गेट प्राइजसह गुंतवणूक करू शकता.
-
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पुढील आठवड्यात पाच टक्के नफा कमावू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी ६४० रुपयांची टार्गेट प्राइज निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे ५% वर आहे. गुंतवणूक करताना ५८८ रुपये स्टॉप लॉस ठेवावा. (Reuters)
-
दिग्गज एमएनसी कंपनीमध्ये गेल्या व्यावसायिक आठवड्यात कोणतीही लक्षणीय हालचाल झाली नाही, परंतु पुढील आठवड्यात यामध्ये गुंतवणूक केल्यास आठ टक्क्यांहून अधिक नफा मिळू शकतो.
-
त्याचे शेअर्स सध्या ३१३.८५ रुपयांवर आहेत आणि आता ते ३४० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. तथापि, गुंतवणूक करताना २९४ रुपये स्टॉप लॉस ठेवावा.
-
शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे सर्व योजनासंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार गुंतवणुकीचे निर्णय घ्या. (सर्व फोटो: Indian express Financial Express File Photo)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”