-
जांभूळ दिसायला खूप लहान असतो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिएंट्स प्रमाण असतं. तुम्ही जांभूळ खाल्ल्यावर शरीराला मोठ्या प्रमाणावर आयर्न, कॅल्शियम, फॉस्परस, सोडीयम, मॅग्नेशियम, विटॅमिन बी आणि विटॅमीन सी मिळते. (image-freepik.com)
-
जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं. दातांची स्वच्छता, वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. मात्र, या फळासोबत या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.(image-freepik.com)
-
लांबट आकाराची जांभळे चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते.(image-freepik.com)
-
जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असते. जांभळाच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते. साधरणत: जांभळांचा मोसम एप्रिल- मे महिन्यात असतो. (image-freepik.com)
-
हळद ही एक आयुर्वेदीक ओषधी आहे. हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण जांभळासोबत हळद कधीच खाऊ नका. कारण त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणं आणि अॅलर्जी होण्याचा धोका असतो. (image-freepik.com)
-
जांभळासोबत कधीच मिल्क प्रोडक्ट्स खायचे नाहीत. कारण याचं सेवन केल्यावर पोटात दुखण्याची समस्या निर्माण होते. तसंच पचनक्रिया, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात. जांभूळ खाण्याआधी किंवा नंतर दुध प्यायचे नाही. (image-freepik.com)
-
जांभूळ खाण्याआधी किंवा खाल्ल्या नंतर लोणचं खाऊ नका. कारण लोणचं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते. तसंच तुम्हाला उलटी होऊ शकते. (image-freepik.com)
-
जांभळाचे बी व साल मधुमेह आजारावर अत्यंत उपयुक्त असते. (image-freepik.com)
-
लांबट आकाराची जांभळे चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. (image-freepik.com)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?